Dhananjay Munde : परळीत राष्ट्रवादीचा गुलाल; धनंजय मुंडे व्हिडीओ शेअर करत म्हणाले, "आई हे यश…"

Dhananjay Munde video with mother after NCP won 81 Gram Panchayat seat in parli constituency election result
Dhananjay Munde video with mother after NCP won 81 Gram Panchayat seat in parli constituency election result
Updated on

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निकालांमध्ये राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचे निकालांचा समावेश आहे. निवडणूकीतून थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार ही निवडणूक पार पडली. दरम्यान या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातीलतील ग्रामपंचायतींचा निकाला हा त्यांच्या आईच्या पायी अर्पण केला आहे.

मुंडे यांनी निकाल लागल्यानंतर याबद्दल ट्विट करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या आईचे आशीर्वाद घेताना दिसून येत आहेत. "आई हे यश तुझ्या चरणी. परळी मतदारसंघात १३० पैकी सुमारे ८१ ग्रामपंचायती मायबाप जनतेच्या आशीर्वादाने, शरद पवार यांच्या नेतृत्वात विजयी झाल्या आहेत. आई, हा विजय तुझ्या चरणी अर्पित..." असेही त्यांनी म्हटलं आहे.

Dhananjay Munde video with mother after NCP won 81 Gram Panchayat seat in parli constituency election result
NIT Land Scam : CM शिंदेंवर आरोप होतायत तो 'नागपूर न्यास घोटाळा' काय आहे?

परळी मतदारसंघात १३० पैकी ८१ जागी राष्ट्रवादीला विजय मिळाल्याचा दावा मुंडे यांनी यावेळी केला आहे. तसेच त्यांनी "गाव पातळीवर काम करणाऱ्या प्रत्येक सहकारी-कार्यकर्त्याचे यश आहे... अधिक जबाबदारीने पुढेही काम करू." असं अश्वासन देखील यावेळी दिलं आहे.

Dhananjay Munde video with mother after NCP won 81 Gram Panchayat seat in parli constituency election result
Corona Outbreak : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर! लोकांना बेड-औषधं मिळेनात; मृतदेह ठेवायलाही जागा नाही

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा कौल भाजपच्या बाजूने लागल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणूकीत ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींपैकी भाजपच्या ताब्यात १९६६ , राष्ट्रवादीच्या ताब्यात १४४६ ,शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात ६६१, काँग्रेसच्या ताब्यात ८३८ , शिंदे गटाच्या ताब्यात ८०२ ग्रामपंचायती आहेत. तर काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.