बीड : देशासह राज्यात कोरोनाचे नवीन व्हेरिएंट ओमिक्राॅनच्या रुग्ण संख्येत वाढत होत आहे. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करायचे आवाहन करित आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे ही लाॅकडाऊनचे संकेत देत आहेत. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे दिसत आहेत. आज मंगळवारी (ता.चार) बीडच्या (Beed) परळीतील जनक्रांती संघटनेचे युवा नेते राजाभाऊ फड यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी खुद्द धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी कोरोना नियम धाब्यावर ठेवल्याचे दिसले. ना शारीरिक अंतर पाळले गेले, ना मास्क लावल्याचे दिसले. मग काय फक्त कोरोनाचे निर्बंध आणि लाॅकडाऊन जनतेसाठीच का? आणि राजकारणी आणि मंत्री महोदय सुसाट का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(Dhananjay Munde Violets Corona Norms In Parli Taluka Of Beed)
ट्विटमध्ये ते म्हणतात, परळीतील जनक्रांती संघटनेचे युवक नेते राजाभाऊ फड यांनी त्यांच्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा इतका प्रचंड उत्साह आणि गर्दी होती की मलाही त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. सर्वांचे स्वागत.
मुंडे यांच्या ट्विटवर मयूर कुल्हाने म्हणतात, कोरोना नाही का इथे??? मायला कोरोना फक्त एसटी कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, हात मजूर आणि सामान्य नागरिक यांनीच कोरोनाचे पालन करायचे का? राजकारण या देशाला लागलेली किड...
मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा. कोरोनाचे कारण देऊन कुठल्याही परीक्षा रद्द करण्यात येऊ नये, अशी विनंती संतोष चव्हाण यांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.