Earthquake : लोहारा तालुक्यातील सास्तूर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का, १.८ रिस्टर स्केलची नोंद

लोहारा तालुक्यातील सास्तर परिसराला बुधवारी (ता. पाच) दुपारी चार वाजून ३२ मिनिटाच्या सुमारास १.८ रिस्टर स्केल भूकंपाचा सौम्य धक्का बसला.
earthquake
earthquakesakal
Updated on

लोहारा (जि. धाराशिव) - लोहारा तालुक्यातील सास्तर परिसराला बुधवारी (ता. पाच) दुपारी चार वाजून ३२ मिनिटाच्या सुमारास १.८ रिस्टर स्केल भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

१९९३ साली झालेल्या प्रलंयकारी भूकंपानंतर लोहारा तालुक्याला भूकंप प्रवणक्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्यावेळी तालुक्यातील ३२ गावे उध्वस्त झाली होती. त्यात अनेक नागरिक मृत्यूमुखी पडली. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले होते. या जुण्या आठवणीने आजही अंगावर शहारे उभे राहतात.

तालुक्यात अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. बुधवारी दुपारी ४ वाजून ३२ मिनिटाच्या सुमारास लोहारा तालुक्यातील सास्तूर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. जमीनितून गूढ आवाज आला. काही क्षण जमीन हदरली.

सास्तूर, होळी, उदतपूर, सालेगाव, तोरंबा, हराळी, रेबेचिंचोली, एकोंडी, कोंडजीगड, करजगाव तर औसा तालुक्यातील गुबाळ, मंगरूळ या परिसरालाही भूकंपाचा धक्का बसल्याची चर्चा नागरिकांत होती. दरम्यान, लातूर येथील भूकंपमापक यंत्रात १.८ रिस्टरस्केलची नोंद झाल्याची माहिती के. जी. परदेशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.