Dharashiv : शेतकऱ्यांवर पशुधनाच्या चोरीचेही संकट

मांसविक्रीचा धंदा जोमात; शेतकरी चिंतेत, पोलिसांनी द्यावे लक्ष
dharashiv
dharashivsakal
Updated on

धाराशिव - दुष्काळाच्या संकटात अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पशुधनाच्या चोरीचे नवीन संकट सतावत आहे. बैल, म्हैस, शेळी अशा जनावरांवर चोरटे वाहनातून घेऊन जात आहेत. पोलिसांच्या डोळ्याआडून मांसविक्रीचा धंदा जोमात सुरू असून त्याला पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जित्राबावर डल्ला मारला जात आहे. पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

जिल्ह्यात यंदा दुष्काळाचे सावट गडद दिसत आहे. रब्बी हंगाम संकटात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जित्राब सांभाळणे जिकिरीचे होऊन बसले आहे. एकीकडे चाऱ्याची टंचाई सुरू असताना दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. जनावरे चोरी करणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली असल्याचे चित्र आहे. दररोज कुठे-ना-कुठे चोरीचे प्रकार घडत आहेत.

गेल्या आठवड्यात मुरुममध्ये (ता. उमरगा) शेळ्या चोरीचा प्रकार घडला. त्यानंतर कळंब तालुक्यातही असेच प्रकार घडत आहेत. जिल्ह्यात मांसविक्रीचा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याला पोलिस प्रशासनाचाही आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जनावरे चोरीला जात असल्याचा संशय शेतकरी व्यक्त करीत आहेत.

dharashiv
Beed News :विद्यार्थी गणवेशाचा घेतलेला निधी सरकारकडून सुपूर्द

मोहा, बाभळगावमध्ये गाय-बैलाची चोरी

बाभळगाव (ता. कळंब) येथील शिवारातून एका शेतकऱ्याच्या शेतातून बैलजोडी चोरीला गेली आहे. बाळासाहेब जगन्नाथ भातलवंडे यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेले दोन बैल चोरट्यांनी पळविले आहेत.

dharashiv
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील जुन्या दस्तऐवजांमध्ये ‘कुणबी’ नोंद

सुमारे ६२ हजार रुपयांची ही बैलजोडी होती. त्यांच्या शेजारील रामकिसन गणपती जगताप यांच्या शेतातील एक लाख १७ हजार रुपये किमतीची एक गाय व वासरू त्याच दिवशी चोरीला गेले आहे. चार सप्टेंबरच्या मध्यरात्री चोरीचा प्रकार घडला. बाळासाहेब भातलवंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मोहा (ता. कळंब) येथील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या गायी दोन सप्टेंबरला चोरीला गेल्या आहेत.

dharashiv
Pune News : इनामगाव येथील प्राचीन उत्खनन स्थळाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाकडून साडे सहा कोटी रुपये निधी

आम्ही घरीच बैलावर शेत करताव. आता बैलच चोरीला गेल्यात. पोराच शिक्षण, वाढता खर्च. त्यात पाऊस नाही. आम्हाला चौकून संकटात टाकत्यात.

बाळासाहेब भातलवंडे, शेतकरी, बाभळगाव (ता. कळंब).

आमच्या दोन गायी शनिवारी (ता. २) चोरीला गेल्या आहेत. पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्षांसमोर एकाने चोरीची कबुली दिली आहे. मात्र अद्याप माझ्या पावणेदोन लाखाच्या गायी मिळाल्या नाहीत.

सतीश मडके, मोहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.