येरमाळा ता.१(बातमीदार): धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीत अखेर महायुतीचा उमेदवार निश्चित झाला असून महायुतीच्या शिवसेना,भाजपा कडून या जागेवर दावा होता.मात्र महायुतीतून धाराशिवची जागा अजित पवार गटाला जाहीर झाली असून विधानसभेचे विद्यमान आमदार विक्रम काळे यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाले असले तरी आज पक्षाच्या वतीने सुनील तटकरे हे पत्रकार परिषदेत जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना बाले किल्ला म्हणून धाराशिव लोकसभा मतदार संघाची ओळख असून विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार निश्चित झाले आहेत.त्यांनी मतदार संघाचे दौरेही सुरु केले आहेत.मात्र महायुतीतून ही जागा विद्यमान खाजदार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आल्याने एकनाथ शिंदे गटाला सुटेल अशी अपेक्षा होती.
जिल्ह्याचे पालक मंत्री तथा राज्यचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आपले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले पुतणे धनंजय सावंत यांच्यासाठी महायुतीतून उमेदवारी साठी जोर लावला होता.धाराशिव भाजपाचे शिष्टमंडळही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला मुंबईला जावून उमेदवार देण्याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते.मात्र महायुतीतून ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्याचे निश्चित झाल्याने जिल्ह्यात विविध राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
विक्रम वसंतराव काळे हे जिल्ह्यातील पळसप येथील रहिवासी असून विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत.त्यांचे वडील कै.वसंतराव काळे हे दोन वेळा शिक्षक आमदार राहिले आहेत.त्यांचा अकाली निधन झाल्याने पोट निवडणुकीत विक्रम काळे शिक्षक आमदार होते त्यानंतर ते दुसऱ्यांदा विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत.त्यांचा मतदार संघात, शिक्षकांशी व सर्व सामान्यांशी साधा सरळ माणूस म्हणून असलेल्या ओळखीच्या जोरावर पक्षाने उमेदवारी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या नावाची आज दुपारी अधिकृत घोषणा पक्षाचे प्रवक्ते सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन करणार असल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.