MLA Amit Deshmukh : जनतेच्या लोकन्यायालयात पुन्हा ओमराजेंचा न्यायनिवाडा होईल

पक्षांतर करून पक्षाचे चिन्ह काढुन घेण्याची किमया विरोधकांनी साध्य केलेली असली तरी धनुष्यबान व घड्याळ चिन्ह नेमके कुणाचे आहे, हे सामान्य माणसांना माहित आहे.
MLA Amit Deshmukh
MLA Amit Deshmukhsakal
Updated on

उमरगा (जि. धाराशिव) - पक्षांतर करून पक्षाचे चिन्ह काढुन घेण्याची किमया विरोधकांनी साध्य केलेली असली तरी धनुष्यबान व घड्याळ चिन्ह नेमके कुणाचे आहे, हे सामान्य माणसांना माहित आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असले तरी लोकसभा निवडणुकीच्या लोकन्यायालयात मतदार हा न्यायधिशच्या भूमिकेत असल्याने तोच मतदानरूपी प्रक्रियेतुन योग्य न्याय निवाडा करेल, याची खात्री वाटते असे सांगुन पाच वर्ष नेहमी जनतेच्या संपर्कात राहुन काम करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर यांना पुन्हा संधी देण्याचे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी केले.

उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात गुरूवारी (ता. २५) आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात आमदार देशमुख बोलत होते. महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळाकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, तालुकाध्यक्ष अँड. सुभाष राजोळे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, संजय चालुक्य, विलास शाळू, अमर खानापुरे, राजाभाऊ शेरखाने, महेश देशमुख, विजय वाघमारे, एम. ओ. पाटील, विजय दळगडे, याकुब लदाफ, श्री.पत्रिके, अजिंक्य मोरे, उमरगा बाजार समितीचे सभापती रणधीर पवार, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, मधुकर यादव आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, राज्यातील भाजपाने शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फोडला आमच्याही (काँग्रेसच्या) खिडक्या चोरल्या असून या चोरीला गेलेल्या खिडक्या परत आमच्याकडे नको, अशी जनतेची ओरड होत असल्याचे सांगून श्री. देशमुख यांनी बसवराज पाटील यांचे नाव न घेता टीका केली.

उसाला तोंड असते का? असे म्हणत तोंड पाहुन ऊस नेण्याच्या तक्रारी आहेत. पण शेतकऱ्यांच्या उसाला न्याय देण्यासाठी मांजरा परिवाराने धाराशिव जिल्ह्यात पदार्पण केले असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, तुम्ही म्हणाल तेथे कारखान्याचे कार्यालय काढू असे आश्वासन दिले. शैक्षणिक, सामाजिक चळवळीत मोरे कुटुंबियांचे व (कै.) विलासराव देशमुख यांचे चांगले नाते होते. अश्लेष मोरे तुम्हाला भवितव्य आहे.

असे सांगुन तुम्ही काम करत रहा, उमरग्यात काँग्रेसला बळ देण्यासाठी सहकार्य करू, अशी हमी देशमुख यांनी दिली. या वेळी ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातील विकासासाठी मी केव्हांही तयार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबातील सदस्या सोबत माझे कौटुंबिक नाते तयार झाले आहे. सामान्य माणूस मला विसरू शकत नाही, हीच माझी कमाई आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन लोकांसाठी काम केले आहे. त्यांच्या मार्गाने जाण्याचा मी प्रयत्न करीत आहे. सर्व जातीधर्मातील लोकांचे प्रश्न, विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी माझा लढा कायम राहिल. यापुढील काळात लोकप्रतिनिधि म्हणुन काम करण्याची संधी द्यावी. 'मशाली' ला मतदान करुन विकासाचा प्रकाश निर्माण करण्याची संधी देण्याचे आवाहन निंबाळकर यांनी केले.

प्रारंभी शहरातील मुख्य मार्गावरून दुचाकी फेरी रॅली काढण्यात आली. श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावरील हेलीपॅडवर अश्लेष मोरे यांनी आमदार देशमुख यांचे स्वागत केले. अँड. दिलीप सगर यांनी प्रास्ताविक केले. संजय देशमुख (ढोणे) यांनी सूत्रसंचालन केले. तर अँड. एस. पी. इनामदार यांनी आभार मानले.

गद्दारी करणारे तुम्हीच ठक आहात !

पाच वर्ष जनतेच्या सेवेत आम्ही होतो. पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. तुम्ही पन्नास खोके घेऊन पक्षाशी गद्दारी केलात. आणि उलट आम्हाला ठक म्हणता. खरं तर गद्दारी करणारे तुम्हीच ठक आहात! अशी टिका खासदार ओमराजेंनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावर केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()