Dharashiv : नळदुर्ग किल्ल्यातील प्रसिध्द नर-मादी धबधबे लागले वाहू!

Tuljapur latest News: युनिटी मल्टिकाॕन्स या कंपनीने पुरातत्व खात्याशी सामंजस्य करार करून किल्ल्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या.
Dharashiv nar madi waterfalls of Naladurg fort began to flow Tuljapur
Dharashiv nar madi waterfalls of Naladurg fort began to flow Tuljapursakal
Updated on

Latest Dharashiv Rain News: धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय पाणी महाल येथील नर-मादी धबधबे गुरूवार ( ता. २६ ) रोजी सुरू झाले. जागतिक पर्यटन दिनाच्या (२७ सप्टेंबर ) पार्श्वभूमीवर पर्यटकांना किल्ल्यातील विहंगम दृश्य पाहण्याचा आनंद दोन वर्षानंतर घेता येणार आहे.

मागील आठवडा भरापासून पाऊस सुरू असल्यामुळे बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून वाहून पाणी बोरी नदीमार्गे किल्ल्यातील धबदधब्यातून वाहू लागले आहे. यामुळे पर्यटकांना नयनरम्य धबधबे पाहण्याचा आनंद घेता येत आहे. मागील दहा वर्षे सोलापूर येथील युनिटी मल्टिकाॕन्स या कंपनीने पुरातत्व खात्याशी सामंजस्य करार करून किल्ल्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.