Dharashiv Sugar Factory : आयकर धाड हे विरोधकांचे षडयंत्र : अभिजीत पाटील

धाराशिव शुगर वर पडलेल्या आयकर धाडीत हाती कांहीच लागले नाही; चेअरमन अभिजित पाटील
Dharashiv Sugar Factory
Dharashiv Sugar Factory
Updated on

खामसवाडी : चोरखळी ता. कळंब येथील धाराशिव शुगरसह अन्य चार ठिकाणी पडलेल्या आयकर धाडीत काहीच सापडले नाही, असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले. गुरुवारी पहाटे पाच वाजता डीव्हीपी ग्रुपचे प्रमुख अभिजीत पाटील यांच्या ताब्यात असलेल्या पाच साखर कारखाने व अन्य ठिकाणी आयकर विभागाच्या वीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाडी टाकून तीन दिवस चौकशी केली. यात आयकर विभागास अवैध पैसा, सोने काहीच हाती लागले नाही. जी कागदपत्रे उपलब्ध होती त्याची आयकर विभागाने पाहणी केली जी कागदपत्र उपलब्ध नव्हती, ती देण्यास पंधरा दिवसाचा वेळ घेतल्याचे पाटील म्हणाले. विरोधकांचे हे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.

चोराखळी ता. कळंब येथील धाराशिव शुगर , नाशिक, नांदेड, सांगोला, बीड येथे पाटील यांनी साखर कारखाने घेतले आहेत. त्यातील तीन भाडेतत्वावर असून दोन महिन्यांपूर्वी पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना विरोधकांना धुळ चारीत सभासदांनी पाटील यांच्याकडे सोपवला. यातून पाटील यांचे नाणे खणखणीत असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

अभिजीत पाटील यांचा वारू रोखयचा असेल तर षडयंत्र करावे या हेतूने कटकारस्थाने शिजवून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातही त्यांचा डाव यशस्वी झाला नाही कारण ज्या संशयावरून आयकरची कार्यवाही झाली त्यात गैरमार्ग कुठेही केला नव्हता. जे कारखाने घेतले ते कर्ज काढून घेतले. त्या कर्जाची नियमीत परतफेड सुरु आहे. धाडीत कुठे अवैध पैसा, सोने सापडले नाही असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.