Dharashiv : तुळजापूर कृषी कार्यालयात समस्यांचा पूर तीन गावांसाठी एक कृषी सहायक; 30 पदे रिक्त, शेतकऱ्यांची अडचण

पंतप्रधान किसान योजना राबविण्यासाठी ग्रामसेवक, महसूल खात्याचे तलाठी तसेच कृषी सहायक यांच्या मार्फत कागदपत्रे पूर्ण करावी लागतात.
osmanabad
osmanabad sakal
Updated on

तुळजापूर - तालुका कृषी कार्यालयात समस्यांचा महापूर निर्माण झाला आहे. कोणत्याही सुविधा कृषी कार्यालयाकडे नाहीत. कृषी कार्यालयामार्फत प्रधानमंत्री किसान योजना, पीकविमा योजना तसेच अनेक शेतीवरील प्रत्यक्ष पाहणी आणि त्याचे अहवाल करणे असे वेगवेगळी कामे कृषी कार्यालयास आहेत. १२८ गावे तालुक्यात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने प्रधानमंत्री किसान योजना महसूल खात्याकडून कृषी कार्यालयाकडे वर्ग केली आहेत.

तथापि तालुक्यात कृषी कार्यालयाकडे एकूण ८४ पदे असून ३० पदे रिक्त आहेत. त्यामध्ये मंडळ कृषी अधिकाऱ्यांची तीन, १८ कृषी सहायक, ६ अनुरेखक, २ शिपाई आणि एक वाहन चालकाचे पद रिकामे आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी सहायकांना प्रत्यक्षात शेतात जाऊन पाहणी करून त्याबाबत पुढील कारवाई करावी लागते. तथापि १८ कृषी सहाय्यकांची पदे रिकामी असल्याने एकाच कृषी सहाय्यकांकडे दोन अथवा तीन गावचा पदभार आहे

पंतप्रधान किसान योजना राबविण्यासाठी ग्रामसेवक, महसूल खात्याचे तलाठी तसेच कृषी सहायक यांच्या मार्फत कागदपत्रे पूर्ण करावी लागतात. सगळाच ताण सध्या कृषी सहाय्यकांकडे आलेला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे पंतप्रधान किसान योजना राबविताना स्वतंत्र ऑपरेटर, संगणक, प्रिंटर आदी वस्तू नाहीत. त्यामुळे कार्यालयीन कामकाज कसे करावयाचे हा प्रश्न आहे.

osmanabad
Solapur News : म्हैसाळच्या पाण्यासाठी गावागावात भांडण;पाण्याचे आवर्तन घेण्यासाठी मारामारी

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या खिडक्या खराब झाल्या आहेत. तसेच आच्छादन चांगले नाही. त्यामुळे पाऊस आला की आच्छादनास गळती लागत आहे. शिवाय कृषी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृह नाही. कार्यालयातील वाहन चालक पदावर कोणीही सध्या कार्यरत नाही. तुळजापूर आणि अणदूर तालुका तुळजापूर येथील कार्यालयासाठी मंडल कृषी अधिकारी तीन वर्षांपासून नाहीत.

osmanabad
Latur News : कोकणवासीयांची सोय अन लातूरकरांची गैरसोय

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

शेतकऱ्यांशी निगडित असणाऱ्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा नाहीत. कर्मचार्ऱ्यांची संख्या पुरेशी नाही. तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. असणारे कर्मचारी ओढत ताणत काम करत आहेत. पंतप्रधान किसान योजनेच्या कामासाठी रोज शंभरहून शेतकरी कृषी कार्यालयात खेटे मारत आहेत. त्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना काम करणे भाग आहे.

osmanabad
Lature News : हिंदू मुस्लिम ऐक्याचे लातूर शहरात दर्शन विसर्जनामुळे ईद एक दिवस पुढे

तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी संख्या तसेच अन्य सुविधांकडे दुर्लक्ष आहे. सरकार शेतकऱ्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करते आहे.

श्‍याम पाटील, शेतकरी, मंगरूळ

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात वाहन चांगले नाही. त्यासाठी पत्रव्यवहार चालू आहे. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.

अवधूत मुळे, तालुका कृषी अधिकारी, तुळजापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()