धाराशिव : सोलापूर जिल्ह्यातील वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसांपासून वीजेचा ‘फॉल्ट'' सापडत नसल्याने धाराशिव शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आडेगाव (जि. सोलापूर) उपकेंद्रात हा प्रकार झाला असून शहरातील पाणीपुरवठा आठ ते १० दिवसांवर पोहचला आहे.
धाराशिव शहराला उजनी (जि. सोलापूर) येथून सुमारे १८१ किलोमीटर अंतरावरून पाण्याचा पुरवठा केला जातो. सोलापूर जिल्ह्यातील उजनी आणि खांडवी अशा दोन ठिकणी पाण्याचा उपसा करून धाराशिव शहराला पाणी पोहचते. या दोन्ही ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत असणे अपेक्षित असते.
मात्र गेल्या दोन दिवसांपासून आडेगाव उपकेंद्रामध्ये अडचणी येत आहेत. प्रत्येक अर्धा ते एक तासाला वीजपुरुठा खंडीत होत आहे. त्यामुळे धाराशिवला होणारा पाण्याचा पुरवठा थांबला आहे.
सणासुदीच्या दिवसात पाणी टंचाई
दसऱ्यानंतर आता दिवाळीची नागरिकांना चाहूल लागली आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यातच विजेच्या लपंडावाने पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. सध्या शहराला चार ते पाच दिवसातून एकदा पाणी मिळते. त्यात दोन दिवसांचा खंड पडत असल्याने पाणीपुरवठा आठ ते १० दिवसांवर गेला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीतच पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत.
शहरात दोन दिवसांपासून पाणी पुरवठ्यात विस्कळितपणा आला आहे. आडेगाव (जि. सोलापूर) उपकेंद्रात अडचणी येत आहेत. अर्धा ते एक एक तासाला वीज खंडीत होत असल्याने अडचणी वाढत आहेत.
— अक्षय नरे, अभियंता, धाराशिव पालिका
आमच्या आडेगाव उपकेंद्रात अडचणी आहेत. तेथील अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचण शोधण्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप त्याचे कारण समजलेले नाही. आमचे अधिकारी तांत्रिक अडचण शोधत आहेत. लवकरच ही समस्या सुटेल.
— संजय शिंदे, प्रभारी अधीक्षक अभियंता, सोलापूर.
आमच्या समर्थनगर परिसरात आठ दिवसांपासून पाण्याचा पुरवठा झालेला नाही. गेल्या शुक्रवारी पाणी आले होते. त्यानंतर आजही म्हणजे शुक्रवारी पाणी आलेले नाही. ऐन सणासुदीत असा दुर्दैवी प्रकार होत आहे. प्रशासन याची दखल घेणार आहे की नाही.
— शिवाणी परदेशी, समर्थनगर, धाराशिव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.