बीडमधील धुळे - सोलापूर महामार्गाच्या नूतनीकरणाला गडकरींचा ग्रीन सिग्नल

पूर्वी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात होता. काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे विस्तारीकरण झाले
nitin gadkari
nitin gadkarinitin gadkari
Updated on

बीड: धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण झाले आणि शहरातून जाणाऱ्या १२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचा प्रश्न उभा राहिला. परंतु, आता हा प्रश्नही मार्गी लागणार आहे. बुधवारी (ता. २८) दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी एकत्र असल्याचा योग साधून आमदार संदीप क्षीरसागर यांनी गडकरींकडे मुद्दा मांडला आणि गडकरींनी प्रशासकीय मान्यता देण्याला ग्रीन सिग्नल दिला.

पूर्वी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात होता. काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे विस्तारीकरण झाले. त्यामुळे महामार्ग बाह्यवळण रस्ताद्वारे शहरापासून गेला. परिणामी कोल्हारवाडी बाह्यवळण रस्ता ते बार्शी नाका- छत्रपती शिवाजी महाराज चौक, जालना रोड मार्गे जिरेवाडी बाह्यवळण रस्ता या १२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे विस्तारीकरण, मजबुतीकरण, ड्रेनेज असा प्रश्न निर्माण झाला.

nitin gadkari
नांदेडात ‘आयजी’च्या आदेशानंतर अधिकारी लागले कामाला

या कामाला मंजूरी मिळावी म्हणून बीडचे राष्ट्रवादीचे आमदार क्षीरसागर यांचा पाठपुरावा सुरु होता. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून यापूर्वीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. मात्र, या नूतनीकरणाच्या कामात काही तांत्रिक अडचणी असल्याने कामाला प्रशासकीय मान्यता मिळत नव्हती. दरम्यान, बुधवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे या देखील दिल्लीत असताना संदीप क्षीरसागर हा मुद्दा घेऊन पोहोचले.

nitin gadkari
मावेजासाठी नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर काम बंद आंदोलन

काम लवकर पूर्ण होण्यासाठी करणार पाठपुरावा : क्षीरसागर
शरद पवारांच्या परवानगीने संदीप क्षीरसागर यांनी गडकरींकडे हा मुद्दा उपस्थित करून प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली. अनेक वर्षांपासून अडकलेला हा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी ‘सकाळ’ला सांगितले. तरीही काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी देखील माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.