नांदेड : एरवी कुणी विनाटिकीट प्रवास करणारा प्रवाशी आढळुन आल्यास त्या प्रवाशास ज्या स्थानकावरून रेल्वे निघाली, त्या स्थानकापासून ते शेवटच्या स्थानकापर्यंत अशा पद्धतीने दुपटीने प्रवासभाडे वसूल केले जाते. तसा नियम देखील आहे. मात्र, एखाद्या प्रवाशाने महिणाभरापासून प्रवासाचा बेत आखला असताना व रेल्वेचे वातानुकुलित तिकीट बुक केले असताना एनवेळी रेल्वेप्रशासनाच्या घोडचुकीमुळे ज्येष्ठ दाम्पत्यास मनस्ताप सहन करावा लागत असेल तर काय? अगदी असेच काही नांदेडच्या ज्येष्ठ बंग दाम्पत्याच्या बाबतीत घडले आहे.
डॉ. सत्यनारायण बंग व त्यांच्या पत्नी विमल बंग यांना (ता.३०) मे २०१९ ला नातवंडाला भेटण्यासाठी बेंगलोरला जाण्याचा बेत आखला होता. यासाठी त्यांनी एक महिण्यापूर्वीच म्हणजे (ता. ३०) एप्रिल २०१९ रोजी पेटीएद्वारे नांदेड - बेंगलोर (हंपी लिंक एक्सप्रेस) चे प्रथम श्रेणीचे टिकीट बुकींग केले होते. ठरल्याप्रमाणे बंग दाम्पत्य सायंकाळी अर्धा तास अगोदर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. साडेपाचच्या सुमारास गाडी स्थानकात दाखल झाली. परंतू, त्यांच्या हातातल्या टिकीटावर जो बोगी नंबर आणि सिट नंबर देण्यात आला होता. ती बोगी रेल्वेला जोडण्यातच आली नव्हती.
टी. सी.ला विनंती करुन २५ तास प्रवास
रेल्वे निघण्यापूर्वी कोच जोडला जाईन असे या ज्येष्ठ दाम्पत्यास वाटत होते. परंतू, तसे काहीच झाले नाही. गाडी निघण्याची वेळ झाली. आणि ६५ - ७० वर्षाच्या जोडप्याची धांदल उडाली. दरम्यान, त्यांनी स्टेशन मास्तरशी भेटुन वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. शेवटी त्यांनी स्थानकारील टी. सी.ला विनंती करुन रेल्वेत बसू देण्याची विनंती केली त्यानंतर त्यांना टीसीने टु टायर कोचमधील सिट क्रमांक आठ, आणि नऊ उपलब्ध करून दिले.
उर्वरित पैसे परत केलेच नाही
डॉ. बंग यांची बायपास सर्जरी झाली असतानादेखील रेल्वे प्रशासनाच्या एका चुकीमुळे त्यांना नांदेड ते बेंगलोर असा जवळपास २५ तासाचा प्रवास बसून करावा लागला. प्रवासादरम्यान बंग दाम्पत्याने या गाडीचा एसी कोच रद्द करण्यात आला असल्याची लेखी द्या, अशी मागणी केली. तेंव्हा गाडीमधील टीसीने ‘एसी टु टायरचा तिकीटाचा दर फस्ट एसी पेक्षा कमी आहे’, असे त्या प्रवासी दाम्पत्यांच्या टिकीटावर लिहून दिले. मात्र त्यांनी उर्वरित पैसे परत केलेच नाही. विशेष म्हणजे रेल्वेने हा कोच रद्द केल्याची कुठलाही पूर्व कल्पना संबंधीत प्रवाशी दाम्पत्यास दिली नव्हती. किंवा मेसेज देखील केला गेला नाही. त्यामुळे ज्येष्ठ दाम्पत्यास २५ ते २६ तासाच्या प्रवासादरम्यान प्रचंड मानसिक तान सहन करावा लागला होता.
हेही वाचले पाहिजे- नांदेडमधील ‘ही’ सामाजिक संस्था जपतेय मानवी मूल्य, कोणती? ते वाचायलाच पाहिजे
ग्राहक मंचने निकाल
रेल्वेच्या गलथान काराभाराविरोधात डॉ. सत्यनारायण बंग यानी नांदेडला परल्यानंतर (ता.२६) जून २०१९ रोजी ग्राहक मंचकडे शारिरीक व मानसिक त्रासापोटी एक लाख व दावा खर्च म्हणून २५ हजार देण्यात यावेत अशी मागणी केली होती. नुकताच ग्राहक मंचने निकाल दिला असून, रेल्वे प्रशानाने बंग दाम्पत्यास प्रवासाचे पूर्ण भाडे परत करून प्रत्येकी २२ हजार रूपये याप्रमाणे ४४ हजार रुपये देण्यात यावेत अशा निकाल दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.