Maratha Reservation Survey Paithan : पैठणमध्ये सर्वेक्षणात अडथळा सुरूच ; दिवसभरात ८ ते १० कुटुंबांचीच माहिती भरणे शक्य,नेटवर्कची अडचण

मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील कुटुंबांच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. हे काम मोबाईलवर सुरू असून नेटवर्कची अडचण येत असल्याने संथगतीने सर्वेक्षण होत असल्यामुळे यंत्रणेला डोकेदुखी वाढली आहे. नेटवर्क नसल्याने बऱ्याचदा दिवसभरात ८ ते १० कुटुंबांचेच सर्वेक्षण पूर्ण होत आहे. गत गेल्या चार दिवसात पैठण तालुक्यात १५ हजार ४२१ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती नोडल अधिकारी तथा तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली.
paithan
paithansakal
Updated on

पैठण : मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील कुटुंबांच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. हे काम मोबाईलवर सुरू असून नेटवर्कची अडचण येत असल्याने संथगतीने सर्वेक्षण होत असल्यामुळे यंत्रणेला डोकेदुखी वाढली आहे. नेटवर्क नसल्याने बऱ्याचदा दिवसभरात ८ ते १० कुटुंबांचेच सर्वेक्षण पूर्ण होत आहे. गत गेल्या चार दिवसात पैठण तालुक्यात १५ हजार ४२१ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती नोडल अधिकारी तथा तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली.

paithan
Paithan: धक्कादायक ! नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी त्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून घरोघरी जाऊन कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे काम २३ पासून सुरू झाले आहे. दरम्यान सर्वे करताना यंत्रणेला नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे. सर्वे डाटा ऑनलाइन भरताना डाटा लवकर अपलोड होत नाही. यामुळे, दिवसभरातून केवळ पाच ते सहा कुटुंबीयांचाच सर्वे होत आहे. याबाबत तांत्रिक टीमकडून काम करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. या सर्वेक्षणात मराठा समाजाच्या प्रश्नांची जंत्री आहे. ३० जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. पण नेटवर्कची अडचण पाहता, हे शक्य आहे का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

paithan
Maratha Reservation: 'मराठा आरक्षणासंबंधी सरकारच्या निर्णयाशी मी सहमत नाही, कारण...'; नारायण राणेंनी स्पष्ट केली भूमिका

ग्रामीण भागात ७९ हजार कुटूंबे

तालुक्यातील ७९ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी ४२६ प्रगणक व २२ सुपरवायझर टीम काम करीत आहे. दोन दिवसात १५ हजार कुटूंबांचे सर्वेक्षण केले गेले आहे. नोडल अधिकारी मोबाईलवरून दरदिवसाच्या कामकाजाचा आढावा घेत आहे. शहरात २० हजार कुटुंब असून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी बहुतांशी कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणासाठी साहित्य देण्यात आले. सर्वेक्षणाची ऑनलाईन लिंकही पर्यवेक्षकांच्या मोबाईलवर देण्यात आली आहे. लिंक कार्यरत होण्यासाठी २४ तास लागतात. शहरातही नगर पालिकेकडुन सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू झाल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.