बीड : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राबाबत सगेसोयरे अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करावी, अशी मागणी कायम आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत तब्बल ५० हजार ५५९ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. एकट्या बीड तालुक्यात १० हजार ११६ प्रमाणपत्र वाटप केले असले परळी तालुक्यात मात्र केवळ ८५ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे.
मराठा- कुणबी, कुणबी- मराठा, कुणबी जात अशा जुन्या दस्तऐवजांच्या शोधात सापडलेल्या नोंदींचे वारसांना प्रमाणपत्रांचे वाटप सध्या वेगात सुरु आहे. यात मराठवाडा विभागात नोंदी सापडण्यात व कुणबी प्रमाणपत्र देण्यात बीड जिल्हा अव्वल ठरला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे आंदोलन सुरु झाल्यानंतर मराठा- कुणबी, कुणबी- मराठा व कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
निजामकालीन दस्तऐवजांसह जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टर (गाव नमुना १४), खासरा पत्रक, पाहणी पत्रक, जनगणना रजिस्टर, गाव नमुना क्रमांक सहा, प्रवेश निर्गम रजिस्टर, हक्क नोंदवही या १९१३ ते १९६७ पर्यंतच्या कागदपत्रांमध्ये मराठा- कुणबी, कुणबी- मराठा, कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यात आल्या. यात जिल्ह्यात समितीने तब्बल २७ लाख पाच हजार २१० दस्तावेजांची तपासणी केली. यामध्ये २१ हजार ९०७ कुणबी नोंदी आढळल्या आहेत. अलीकडच्या काळात उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रीया वेगात सुरु आहे.
तालुकानिहाय प्रमाणपत्र वाटप
परळीत केवळ ८५ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. परळी तालुक्यात केवळ २३३ नोंदी आढळल्या आहेत. गेवराईत ८२८७, शिरुर कासार २३७६, पाटोदा ५९०७, आष्टी ८७५७, माजलगाव २८४३, धारुर ८५२, वडवणी १५३०, अंबाजोगाई २५९७, केज ७२०९ याप्रमाणे प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.