फुलंब्री : फुलंब्री येथील पंचायत समितीत अलीमको संस्थेच्या माध्यमातून मागील गेल्या दोन वर्षापासून अपंगासाठी आलेल्या तीन चाकी सायकलला अखेर मुहूर्त सापडला आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली तर खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील 196 अपंगांना तीन चाकी सायकलचे वाटप सोमवारी (ता.दोन) करण्यात आले.