जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांशी साधला संवाद

file photo
file photo
Updated on

परभणी : अग्निशमन दलाच्या व्हॅनमार्फत जिल्हा रुग्णालयात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी कोरोना कक्षास भेट देऊन पाहणी केली व संपूर्ण आढावा घेऊन कक्षात विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.

हेही वाचा - विटेकरांनी जोपासली बांधिलकी; ग्रामीण रुग्णालयास दिली मदत
‘कोरोना’ आपत्ती परिस्थिती पाहता व भविष्यकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने तसेच नागरिकांना दैनंदिन अत्यावश्यक सोयी, सुविधा व सेवा सुलभरीतीने मिळण्यासाठी परभणी शहरातील कल्याण मंडपम, धार रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे वसतिगृह व क्रीडा संकुलाजवळील नवनिर्मित जिल्हा परिषद इमारतींची पाहणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली आपत्ती प्रशासन पथकामार्फत करण्यात आली. या जागी गरजू नागरिकांना भविष्यात विलगीकरण, अत्यावश्यक वस्तूंचे सेवा केंद्र कार्यान्वित करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी पाहणी करून चाचपणी केली. जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि अन्नधान्य, भाजीपाला यांची दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार असून नागरिकांनी नाहक गर्दी करू नये व अफवांना बळी पडू नये. तसेच काही अडचण असल्यास पोलिस नियंत्रण कक्ष परभणी (क्र.०२४५२ - २२६२४४) व्हॉट्सॲप (क्र.७७४५८५२२२२) व आपत्ती प्रशासन कक्षातील दूरध्वनी (क्र.०२४५२ - २२६४००) येथे संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा - सावधान, नांदेड शहरात प्लॅस्टिकचा भस्मासुर वाढतोय

कोषागार कार्यालयात ‘सोशल डिस्टन्सिंग’
 परभणी येथील कोषागार कार्यालयात ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व पटवून देत कार्यालयातील कामकाज केले जात आहे. येथील कोषागार कार्यालयात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांतून संदेश वाहक हे देयके घेऊन येत असतात. त्या वेळी या कार्यालयात दोन व्यक्तींमध्ये विशिष्ट अंतर ठेवून कार्यालयाच्या गेटवरच सॅनिटायझरचा वापर करून मगच आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. यासाठी कोषागार अधिकार सुनील वायकर हे स्वतः सर्वांना महत्त्व पटवून देत काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.