‘या’ जिल्ह्यात हरबरा पिकाची १५१ टक्के क्षेत्रावर पेरणी

Rabbi Pik copy
Rabbi Pik copy
Updated on

परभणी ः जिल्ह्यात रब्बी हंगामात हरबरा पिकांची तब्बल १५१.६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सव्वा लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात रब्बीची ८९.३१ टक्के पेरणी झाली आहे.


यंदा सर्वत्र मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने रब्बी हंगामात पेरण्या जवळपास सगळीकडे होत आहेत. कोरडवाहु क्षेत्रावरील ज्वारी, हरबरा, करडई या पिकांच्या पेरण्या मागील महिण्यात पूर्ण झाल्या आहेत. त्यातील पिके सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. सध्या केवळ सिंचन क्षेत्रावरील पेरण्या सुरू आहेत. गहु आणि हरबरा पेरणी केला जात आहे. 

प्रकल्पातील लाभक्षेत्रात पेरण्या सुरू
जायकवाडी, येलदरी, करपरा यासह अन्य प्रकल्पातील लाभक्षेत्रात पेरण्या सुरू आहेत. यंदा सर्वत्र पाणी असल्याने शेतकऱ्यांनी हरबरा पिकास पसंती दिली आहे. अनेकांनी कपाशीचे पिक बाहेर काढुन त्यात हरबरा पेरणी केले आहे. त्यामुळे यंदा हरबऱ्याचे क्षेत्र वाढले आहे.

दोन लाख ७७ हजार २२८ हेक्टर क्षेत्र रब्बीसाठी अपेक्षित
एकुण दोन लाख ७७ हजार २२८ हेक्टर क्षेत्र रब्बीसाठी अपेक्षित आहे. त्यातील ५३ हजार ६४ हेक्टर क्षेत्र हरबरा पिकासाठी अपेक्षित होते. परंतु, त्याहून अधिक क्षेत्रावर हरबरा पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८० हजार १५८ हेक्टरवर (१५१ टक्के) हरबरा पिकाची पेरणी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ एक लाख ५९ हजार ७८ हेक्टरपैकी एक लाख २७ हजार ३६३ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. गव्हासाठी ३० हजार हेक्टर क्षेत्र अपेक्षित असताना ३२ हजार २०८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पाच हजार ६२७ हेक्टरवर करडई पिकाची पेरणी करण्यात आली आहे.


तालुकानिहाय झालेली पेरणी
परभणी तालुक्यात ७४ हजार ५५ हेक्टर क्षेत्रापैकी ३७ हजार ५६६ (५०.५२), गंगाखेड तालुक्यात ४३ हजार ५६१ हेक्टर क्षेत्रापैकी ३१ हजार ३२७ क्षेत्रावर (७१.९२), पाथरी २४ हजार ८४९ हेक्टरपैकी १५ हजार ८१६ हेक्टर (६३.६५),जिंतूर-२६ हजार ६६९ हेक्टर अपेक्षीत असताना ४१ हजार ९४० (१५७.२६ टक्के), पूर्णा-२१ हजार ८८३ हेक्टर अपेक्षीत असताना २६ हजार ६०३ हेक्टर (१२१.५६), पालम-१९ हजार ३२३ हेक्टरपैकी १५ हजार ९४५ (८२.५२), सेलु-३८ हजार ५५८ पैकी ४१ हजार ३१२ (१०७.१४), सोनपेठ-१८ हजार ३१४ पैकी १७ हजार १०७ (९३.४१), मानवत- नऊ हजार ३४१ पैकी नऊ हजार ७१६ (१९९.८१) असे एकुण दोन लाख ७७ हजार २२८ हेक्टर क्षेत्रापैकी दोन लाख ४७ हजार ५९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.