दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जूनपर्यंत जिल्हाभरात मोहीम

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांची माहिती
Disability certificate
Disability certificateSakal
Updated on

बीड - दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी शासनातर्फे ३० जूनपर्यंत विशेष मोहीम राबविली जात आहे. मोहिमेचा अधिकाधिक दिव्यांगांनी लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी केले आहे. दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) देण्याच्या या मोहिमेस तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी बीड जिल्ह्यांतर्गत विशेष मोहिमेसाठी पुढाकार घेतला. ता. ३० जूनपर्यंत जिल्हा रुग्णालयात आठवड्यातून एकदा तर सोमवार ते शुक्रवार या दिवशी उपजिल्हा रुग्णालय गेवराई, केज, परळी, आष्टी आणि ग्रामीण रुग्णालय माजलगाव येथे शिबिरे होणार आहेत. यामुळे तालुक्यातील व जवळच्या परिसरातील दिव्यांगाना शिबिराचा लाभ घेता येईल. त्यांच्या वेळेची बचत होऊन प्रवासाचा त्रास यामुळे कमी होईल.

माजलगाव ग्रामीण रुग्णालयात ता. १८ व २५ एप्रिल, ता. दोन, २३, व ३० मे आणि ता. सहा, १३, २० आणि २७ जून रोजी हे शिबिर होईल. भीषक डॉ. रुद्रवार, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. आळणे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण देशमुख, बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद कुलकर्णी उपलब्ध असतील. गेवराई उपजिल्हा रुग्णालयात ता.१९, २६ एप्रिल तसेच १०, १७, २४ व ३० मे तसेच सात, १४, २१ व २८ जूनला भिषक डॉ. रुद्रवार, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. जाजू, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मुकेश कुचेरिया, बालरोग तज्ज्ञ डॉ. रऊफ उपस्थित राहतील. आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात २१, २८ एप्रिल तसेच ता. पाच, १३, १९ व २६ मे आणि ता. दोन, नऊ, १९ व २६ जूनच्या शिबिरास भिषक डॉ. रेवडकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. वाघ, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉ. घोडके उपस्थित असतील.

सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

केज उपजिल्हा रुग्णालयात ता. १८ व २५ एप्रिल तसेच दोन, नऊ, २३ व ३० मे तसेच सहा, १३, २० आणि २७ जूनला भीषक डॉ. संजय राऊत, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. लांडगे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. गालफाडे, बालरोग तज्ज्ञ डॉ. सावंत उपस्थित राहतील. परळीत आता २२, व २९ एप्रिल तसेच सहा, १३, २० व २७ मे आणि तीन, १०, १७ व २४ तारखेला भीषक डॉ. दुबे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सानप, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. ताथोडे आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. तिडके हे तपासणीसाठी उपस्थित राहणार आहेत. या दिव्यांग तपासणी शिबिराचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.