VIDEO : ‘कोरोना’चा संसर्ग पाहून दिव्यांगाचे गहरविले मन

IMG20200427070813.jpg
IMG20200427070813.jpg
Updated on


नांदेड ः दोन्ही हात, पाय काम करीत नाहीत, धड उठता-बसता व बोलता न येणाऱ्या नांदेडच्या एका २३ वर्षीय दिव्यांग युवकाचा कोरोना संसर्गाच्या बातम्या बघून व वाचून मन गहरविल्याने इतक्या मोठ्या महामारीच्या संकटातून देशाला व राज्याला आपण काही तरी मदत करून खारीचा वाटा उचलावा, अशी इच्छा त्याने आपल्या आई - वडिलांना बोलून दाखविली. तेंव्हा माझ्या दैनंदिन खर्चातून बचत झालेले अकरा हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे त्याने ठरविल्याने नांदेड - उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते ११ हजारांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

नांदेड जिल्हा पोलिस दलात पोलिस जमादार म्हणून कार्यरत असलेले देविकांत देशमुख यांचा मुलगा अभिजित देशमुख (वय २३, रा. ओंकारेश्वरनगर, तरोडा (बु.) नांदेड) हा दिव्यांग असून सध्या वृत्तपत्रात व टीव्हीवरील कोरोना महामारीच्या बातम्या पाहून आपणही सरकारला काहीतरी मदत करावी, अशी भावना दिव्यांग असलेल्या अभिजितच्या मनात आली. त्याने कुटुंबासमक्ष त्याची भावना व्यक्त केली. या कल्पनेला परिवारानेही एका क्षणातच होकार दिला व त्याने जमविलेल्या त्याच्या स्वतःच्या गल्यातील अकरा हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे ठरविण्यात आले. नांदेड - उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते अकरा हजार रुपयांचा धनादेश रविवारी (ता. २६) जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.


निराधार लोकांना कठीण प्रसंगाचा सामना
या वेळी बोलताना अभिजित म्हणाला की, ‘‘कोरोना विषाणूमुळे देशात व राज्यात लॉकडाउन असल्याने शासनाच्या अर्थ सहाय्यावर अवलंबून असलेल्या विविध योजनेतील निराधार लोकांना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंमुळे निर्माण झालेली परिस्थिती विचारात घेऊन मला ही कल्पना सुचली आणि मी मदत केली.’’ शहरातील देशमुख हेल्थ क्लबचे संचालक गजानन देशमुख व सचिन देशमुख यांचा तो भाचा आहे. यांच्या प्रेरणेतूनही अभिजितने हा निर्णय घेतल्याचे त्याच्या वडिलांनी या वेळी सांगितले. या वेळी नांदेड - उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, माजी नगरसेवक बालाजी देशमुख, किशोरकुमार देवसरकर, के. डी. देशमुख, उमाकांत गंदीगुडे, डी. डी. भोसले, गोविंद पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.