diwali pahat MLA Haribhau Bagde says country has no choice chhatrapati shivaji maharaj
diwali pahat MLA Haribhau Bagde says country has no choice chhatrapati shivaji maharaj Sakal

Diwali Pahat 2023 : देशाच्या मातीलाही शिवरायांशिवाय पर्याय नाही; आमदार हरिभाऊ बागडे

फुलंब्री शहरातील समता शाळेमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी सोमवारी (ता.१३) रोजी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन
Published on

फुलंब्री : भारत-पाक सीमेवरही आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यात आला असून महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या मातीला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन आमदार हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. फुलंब्री शहरातील समता शाळेमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी सोमवारी (ता.१३) रोजी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला अकरा वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी अड. त्र्यंबकराव शिरसाट, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, छत्रपती संभाजी नगर बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे,

भाजपचे तालुकाध्यक्ष सांडू जाधव, अशोक गरुड, शिवाजी पाथ्रीकर, रामबाबा शेळके, माजी जि. प. सदस्य पार्वतीताई शिरसाट, भाजपचे शहराध्यक्ष योगेश मिसाळ, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष वाल्मीक जाधव, ओबीसीचे माजी तालुकाध्यक्ष राम बनसोड, रामेश्वर चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच संपूर्ण महाराष्ट्र चालत असून आता महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

भारत पाकिस्तानच्या सीमेवर नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून भारत मातेचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या सैनिका बरोबर दरवर्षी न चुकता दिवाळी साजरी करीत असतात.

जिथे सैनिक उभे राहून मातृभूमीचे रक्षण करतात ती जागा कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. आपला देश सैनिकांमुळेच सुरक्षित असल्याचे मत यावेळी आमदार हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. यावेळी ज्ञानेश्वर मोटे, अशोक गरुड, दिनकर पाटील, आड. सुदेश शिरसाठ, व्यापारी संघटनेचे रवींद्र काथार, अजय शेरकर, बाळू तांदळे, भगवान निराशे, नाथा काकडे, रोषण अवसरमल, सचिन शेरकर यांच्यासह आदींची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

अमेरिकेत दिवाळी साजरी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी समईतील दिवा लावून वॉशिंग्टन येथील त्यांच्या मंत्रालयात दिवाळी साजरी केली. कारण त्यांच्या उपराष्ट्रपती या भारतीय संस्कृतीच्या असल्याने त्या नेहमीच दिवा लावून दिवाळी साजरी करतात. त्यामुळे आता दिवाळी सण हा नुसता भारतातच नव्हे तर अमेरिका इंग्लंड यासारख्या आदी देश भारतीय संस्कृतीचा वारसा घेत असल्याचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.

दिवाळी आनंदाने साजरी करा : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

फुलंब्री येथील समता विद्या मंदिर शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट या कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचीही उपस्थिती होती. यावेळी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी नागरिकांना दिवाळी, भाऊबीज आणि पाडवा आनंदाने साजरा करावा अशा शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()