नांदेड : जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन असले तरी काही नागरिक काम नसतांना आपले वाहने घेऊन रस्त्यावरून धावतांना दिसून येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनची पायमल्ली होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे अवघड होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जे नागरिक बिनकामाचा प्रवास करतील अथवा शहरांमध्ये फिरतील अशा नागरिकांची वाहने जप्त करण्यात येतील असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी दिला आहे.
नांदेड शहर आणि जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू आहेत. शिवाय लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी घरातच राहणे अपेक्षित असतानाही काही लोक विनाकारण दुचाकीवरून अथवा चारचाकी वाहनातून शहरांमध्ये फेरफटका मारताना दिसून दिसून येत आहेत. कधीकधी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी खोट्या फाईल, अथवा खोटी कारणे सांगून ही माणसं शहरात फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
हेही वाचा - सावधान, नांदेड शहरात प्लॅस्टिकचा भस्मासुर वाढतोय
विनाकारण फिरणारी वाहने जप्त करणार
त्यामुळे आता यापुढे असा प्रवास करणारे किंवा काम नसताना नांदेडमध्ये फिरणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असून त्यांची वाहने जप्त करण्यात येतील. एका ऑडिओ क्लिपद्वारे डॉ. विपिन यांनी हे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी बिनकामाचे फिरू नये असे आवाहनही डॉ. विपिन यांनी केले आहे.
अत्यावश्यक सेवा कमी पडणार नाहीत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि शहरात अन्नधान्याचा तुटवडा भासणार नाही. अत्यावश्यक सेवा कमी पडणार नाहीत. याची माहिती देतानाच अत्यावश्यक सेवा देण्यासाठी शासन तत्पर आहे. अशा वाहनांना कोणीही अडवणार नाही. त्यामुळे नागरिकांनी साठेबाजारी करू नये. ज्या सावकारांकडून साठेबाजी आणि भाव वाढ करण्यात येत आहे त्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल. अशा कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्यात आल्या आहेत. संबंधित दुकानात धाडी टाकण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नागरिकांनी लॉकडाऊनमध्ये आपल्या घरातच बसून राहावे
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या घरातच थांबावे. नांदेड जिल्ह्यात सध्यातरी कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला नाही. ज्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते ते सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तूर्तास नांदेड जिल्हा कोरोनामुक्त असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी दिली आहे. असे असले तरी संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी लॉकडाऊन मध्ये आपल्या घरातच बसून राहावे घराबाहेर कोणी फिरवू नयेत असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी केले आहे.
येथे क्लिक करा - कोरोनाच्या काळोख्या छायेत राबताहेत महावितरणचे हात
कोणताही नागरिकांना अन्नधान्य वाचून उपाशी राहणार नाही
संचारबंदीच्या काळात शासन आणि प्रशासनास काही सामाजिक संस्था, काही लोकसेवक मदत करत आहेत त्या लोकसेवक आणि सामाजिक संस्था यांचे डॉ. विपिन यांनी आभार व्यक्त केले. शिवाय ज्या लोकांना शासनाची मदत करायची आहे. त्यांनी गुगलवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी. आपल्या बद्दलची संपूर्ण माहिती त्यात नमूद करावे ज्यामुळे भविष्यात अशा लोकांची मदत आम्हाला घेता येइल. जिथे कोणतीही यंत्रणा पोहोचत नाही त्या ठिकाणी शासन निश्चितपणे मदत पोहोचेल. नांदेड जिल्ह्यात कोणताही नागरिकांना अन्नधान्य वाचून उपाशी राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.