जालना - परदेशातून शहरात आलेल्या एका नामांकित डॉक्टराने प्रशासनाला माहिती दिली नाही. तसेच स्वत:ला होम क्वारंटाईन न करता रूग्णालयात रूग्णांवर उपचार सुरू केल्याची धक्कादायक बाब गुरूवारी (ता.19) समोर आली आहे.
नागरिकांनी या डॉक्टरची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर आरोग्य विभागातर्फे या डॉक्टरला जिल्हाधिकाऱ्यांसमोर खुलासा सादर करण्यासह हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घेऊन अलगीकरण करून राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
हेही वाचा : हुश्श ऽऽऽ कोरोनाचे तीनही संशयित निगेटिव्ह
राज्यभरात कोरोना विषाणूच्या संख्येत वाढत होत असताना शहरातील एक अस्थी रोग तज्ज्ञ डॉक्टराने परदेशातून येऊन एका खासगी हॉस्पीटलमधील रूग्णावर उपचार केले. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना परदेशातून येऊनही प्रशासनाला कुठलीच माहिती दिली. तसेच स्वतःहून होम क्वारंटाईन न होता रुग्णावर उपचार करत असल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी या डॉक्टरला नोटीस बजावत जिल्हाधिकाऱ्यांसमोर लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले. तसेच स्वतः हुन जिल्हा सामान्य रुग्णालयात हजर होऊन होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारून घ्यावा. व अलगीकरण करून राहण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणी दिरंगाई केल्यास आपत्ती व्यवस्थान कायद्यानुसार सदर डाॅक्टरवर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाने बजावललेल्या नोटीसमध्ये देण्यात आला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.