ढोक महाराजांचं शेतकऱ्यांबद्दल मोठं वक्तव्य : म्हणाले, आत्महत्या...

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : आत्महत्या म्हणजे भावविवश मनाचा आत्म्यावर अत्याचार. ज्या आत्म्याची देह सोडण्याची इच्छा नाही. त्या आत्म्याला वीष पाजून बळच बाहेर काढू नका, असे आवाहन ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांनी केले आहे. 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक घुंगराळा कीर्तनात म्हणाले, की मी शेतकऱ्यांच्या बाजूने असून, शेतकऱ्यांना खरंच कोणी वाली नाही. माझा शेतकरी मंदिरात जाऊन ढसाढसा रडतो. शेतकऱ्यांची आजची वस्तुस्थिती असली तरी आत्महत्या हा त्यावरचा उपाय नाही. दुःख हे मुक्कामाला आलेलं नसतं.. हे पाहूण्यासारखं असतं एक दिवस ते जाणारच आहे.. पुन्हा सुखाचे दिवस येणारच आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका असे आवाहन हभप. ढोक महाराज यांनी केले आहे. 

सूर्याचा उदय पाहण्यासाठी बारा तास रात्र संपण्याची वाट पाहावी लागते तसच सुख दुःखाच ही तसंच असतं. सुख आणि दुःख हे संपत्ती विपत्तीवर अवलंबून नसून, मनाची विषण्णता व प्रसन्नता यावर अवलंबून आहेत. त्यामुळे मनाची प्रसन्नता बिघडवू देऊ नका. या प्रसन्नतेलाच वारकरी संप्रदायामध्ये प्रसाद म्हटलेला आहे.

हा प्रसाद जगामध्ये दोनच व्यक्ती देतात एक भगवंत व दुसरा संत त्यामुळे संताच्या सानिध्यात रहा तुम्हाला जीवनात आत्महत्येचा कधीही विचार येणार नाही असे ते म्हणाले.

म्हाळसाकांत खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार, मूर्ती स्थापना

घुंगराळा (ता. नायगाव) येथील म्हाळसाकांत खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार, मूर्ती स्थापना व कलशारोहण कार्यक्रम शुक्रवार (ता. १४) रोजी परिसरातील मोठ्या जनसमुदायाच्या समक्ष भक्तिभावात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

तत्पूर्वी गुरुवार (ता. १३) रोजी भंडाऱ्याची मुक्त उधळण, ढोल- ताशांचा दणदणाट, संबळ, वाघ्या- मुरळीच्या पारंपारिक वाद्याचा सुमधुर आवाज, मराठी संस्कृती जपणारी वेशभूषा व भगवा फेटा परिधान केलेला भक्तगण, डोईवर मंगल कलश घेऊन सहभागी झालेल्या महिला, तसेच मल्हारी मार्तंडाच्या तालावर पडणारे ठिकाणांची बहारदार प्रदर्शन. आणि हा लक्षवेधी सोहळा पाहण्यासाठी आबालवृद्धांची झालेली गर्दी.. अशा उत्साही वातावरणात टाळमृदुंगाच्या गजरात खंडोबा मूर्तीची सजवलेल्या एका आकर्षक रथातून शानदार मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली. या सोहळ्यात गावातील हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते.

यांनी घेतले परिश्रम 

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तथा उपसरपंच वसंत सुगावे, बालाजीराव मातावाड, दादाराव ढगे, नागोराव दंडेवाड, शिवाजी ढगे, गंगाधर ढगे, शाम यमलवाड, मुरारी तुरटवाड, संभाजीराव तुरटवाड, बालाजी हाळदेवाड, किसन सुगावे, किशनराव दंडेवाड, शिवाजीराव तुरटवाड, जयराम कंचलवाड, प्रल्हाद बोधनकर, मारोती कंचलवाड यांच्यासह गाववासीयांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.