लातूर : १७ हजार विद्यार्थ्यांचा डबल धमाका

एका विद्यार्थ्याचा दोन शाळांत प्रवेश; आधारची सक्ती केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड
विद्यार्थ्यांच्या बोगस पटसंख्येवरून शाळांनी शिक्षकांच्या नियुक्त्यांसह
विद्यार्थ्यांच्या बोगस पटसंख्येवरून शाळांनी शिक्षकांच्या नियुक्त्यांसहsakal
Updated on

लातूर : विद्यार्थ्यांच्या बोगस पटसंख्येवरून शाळांनी शिक्षकांच्या नियुक्त्यांसह विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा लाटण्याचे प्रकार जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी घडले. आता या प्रकाराची पुनर्रावृत्ती सुरू झाल्याचा संशय बळावत आहे. सरकारने संच मान्यतेसाठी यंदा विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीची सक्ती केल्यानंतर जिल्ह्यात पहिली ते बारावीमध्ये सुमारे १७ हजार दुबार विद्यार्थी आढळून आले आहेत. एका विद्यार्थ्याचा अनेक शाळांत प्रवेश असल्याचे यावरून उघड झाले. काही शाळांमध्ये तर सहावीत असलेला विद्यार्थी दुसऱ्या शाळेत नववीमध्ये शिकत असल्याचे पुढे आले आहे. या विद्यार्थ्यांची यादी राज्य सरकारने दिल्यानंतर शिक्षण विभागाने कसून चौकशी सुरू केली असून, संस्थाचालकांनी विविध कारणे सांगून आता या विद्यार्थ्यांचे प्रवेश नाव पोर्टलवरून रद्द करण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

सरकारच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी ३० सप्टेंबरअखेर असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरून संच मान्यता व त्यावरून शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर केली जातात. आधार क्रमांक येऊनही अनेक वर्षांपासून हे काम ऑफलाईन सुरू होते. चालू शैक्षणिक वर्षासाठी मात्र, सरकारने आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येआधारेच संचमान्यता देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या बोगस पटसंख्येवरून शाळांनी शिक्षकांच्या नियुक्त्यांसह
राज्यात कोरोना नियंत्रणात येतोय; मार्च नंतर निच्चांकी संख्येची नोंद

यानंतर सरकारने सर्व शाळांतील पहिले ते बारावीमधील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती सरल प्रणालीत अद्ययावत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सरल प्रणालीतील स्टुडंट पोर्टलमध्ये शाळा लॉगीन करून विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची माहिती अद्ययावत करण्यात आली. चार महिन्यांत शाळांनीही माहिती अद्ययावत केल्यानंतर सरकारला मोठा धक्का बसला. अनेक जिल्ह्यांत मोठ्या संख्येने दुबार विद्यार्थी आढळून आले. यात एकच नाव असलेले विद्यार्थी एकाच शाळेमध्ये वेगवेगळ्या वर्गात (इयत्तेत) व वेगवेगळ्या शाळेमध्ये आढळून आले आहेत.

अनेक विद्यार्थी एकाच शाळेत इयत्ता चौथी व त्याच शाळेत नववीत शिकत असल्याचे तर काही विद्यार्थी एका शाळेत पाचवीत तर दुसऱ्या शाळेत नववीत शिकत असल्याचे आढळले आहे. सरकारने ही बाब गंभीर घेतली आहे. यातूनच सर्व दुबार विद्यार्थ्यांची पडताळणी करण्याचे आदेश असून, त्यानुसार केंद्रप्रमुख, साधन व्यक्तीसह अन्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही पडताळणी सुरू झाली आहे.

जाग्यावर बसूनच पडताळणी सरकारने दुबार विद्यार्थ्यांची पडताळणी करताना विद्यार्थी नेमक्या कोणत्या शाळेत व कोणत्या वर्गात सध्या शिक्षण घेत आहे, याची खात्री करण्याचे आदेश दिले आहेत. क्षेत्रीय यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांची पडताळणी करण्याचे आदेश असताना संबंधित अधिकारी व कर्मचारी जाग्यावर बसूनच हे काम करताना दिसत आहेत.

विद्यार्थ्यांच्या बोगस पटसंख्येवरून शाळांनी शिक्षकांच्या नियुक्त्यांसह
'मीच पूर्णवेळ अध्यक्ष', सोनिया गांधींनी ‘जी-२३’ नेत्यांना ठणकावले

शाळांना विद्यार्थ्यांची यादी देऊन त्यांच्याकडूनच माहिती घेण्यात येत आहेत. शाळांकडूनही टीसी न मिळाल्याने व दुसऱ्या शाळेत नाव दाखवत असल्याने प्रवेश रद्द केल्यासह अन्य कारणे पुढे करून विद्यार्थ्यांची नावे रद्द करण्याचे पत्र दिले जात आहे. या स्थितीत दोन ठिकाणी नाव आढळलेल्या विद्यार्थी नेमका कोणत्या शाळेत आहे, याची खातरजमा केली जात नसल्याने या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेत्यांच्या अन् उर्दू शाळा अधिक दुबार नोंद आढळलेल्या शाळांची संख्या लातूर शहरासह जिल्ह्यातील शहरांच्या ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये सर्वाधिक आढळून आली आहे. यात विविध संघटना व पक्षांचे नेते तसेच कार्यकर्त्यांच्या शाळांतील संख्याही मोठी असून, ती चक्रावून टाकणारी आहे. मराठीच्या तुलनेत उर्दू माध्यमांच्या शाळांत दुबार विद्यार्थी संख्या अधिक दिसत आहे. खासगी संस्थांच्या शाळांतच मोठ्या संख्येने दुबार विद्यार्थी असून, जिल्हा परिषदेच्या शाळांतही दोन हजार विद्यार्थी दुबार आहेत. नावाजलेल्या शाळांतही अशा विद्यार्थ्यांची संख्याही सब घोडे बारा टक्क्याचा प्रत्यय देणारी ठरत आहे.

जिल्ह्यात पहिली ते पाचवीच्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांत एकूण पाच लाख ३९ हजार विद्यार्थी असून, त्यापैकी १७ हजार विद्यार्थी दुबार आढळून आले आहेत. या विद्यार्थ्यांची पडताळणी करण्यात येत आहे. येत्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील सर्व शाळांचा पट शुद्ध व प्रमाणित करण्याचे नियोजन आहे. कोरोनामुळे पालकांचे मोठे स्थलांतर झाले. एका शाळांतून दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या टीसी ऑनलाइन ट्रान्स्फर झाल्या नाहीत. दरवर्षी दुसऱ्या जिल्ह्यातून लातूर, अहमदपूर व उदगीरमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी येतात. यावर्षी कोरोनामुळे उलट प्रकार घडला. पडताळणीत शिक्षण घेत असलेल्या शाळेतच विद्यार्थ्याचे समायोजन करण्यात येऊन अन्य शाळेत असलेले त्याचे नाव रद्द (डिलीट) करण्यात येणार आहे. दुबार विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यानंतर शिक्षक अतिरिक्त होणार आहेत.

- भगवान फुलारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, लातूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()