आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : आखाडा बाळापूर ते नांदेड मार्गावर डोंगरकडा शिवारात ट्रक चालक व क्लिनरला मारहाण करून चोरट्यांनी भुईमूगाच्या बियाणांचे आकरा पोते व रोख रक्कम असा सव्वीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज पळविला आहे. ही घटना मंगळवारी (ता.दहा) घडली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला असून चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून (एमपी ३३-एच-२६७७) ट्रकमध्ये भूईमूगाचे ४२० कट्टे बियाणे लातुरकडे नेले जात होते. मंगळवारी (ता.दहा) रात्री आकराच्या सुमारास हा ट्रक डोंगरकडा शिवारात पंक्चर झाला. त्यामुळे चालक मुकेश जाटव, सौरभ जाटव व क्लिनर राजेश बातम हे खाली उतरले. या वेळी तेथे दुचाकीवर आलेल्या दोघांनी चालक व क्लिनर यांची चौकशी सुरु केली. त्यांनी ट्रकमध्ये भुईमूगाचे बियाणे असून त्यांची बिल्टी नसल्याचे सांगितले.
तिघांनी ट्रक चालक व क्लिनर यांना मारहाण केली
त्यानंतर दुचाकीवरील एक जण तेथेच थांबला. तर दुसरा दुचाकीवर निघून गेला. काही वेळातच त्याने दुचाकीवर आणखी एकास सोबत आणले. त्यानंतर तिघांनी ट्रक चालक व क्लिनर यांना मारहाण केली. यामध्ये मुख्य चालक मुकेश जाटव पळून गेला. याच वेळी चोरट्यांनी सौरभ जाटव व राजेश बातम यांना ट्रकच्या केबीनमध्ये बसवून पुन्हा मारहाण केली. त्यानंतर एका चोरट्याने ट्रक एका ढाब्याजवळ नेला. त्या ठिकाणी आणखी चौघे जण तेथे आले.
सव्वीस हजारांचा ऐवज पळविला
सात जणांनी ट्रकमधील बियाणांचे अकरा कट्टे व क्लिनर कडील दीड हजार रुपये असा सव्वीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज पळविला. या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक विकास थोरात, सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, जमादार भगवान वडकिले, प्रभाकर भोंग यांच्या पथकाने तातडीने शोध मोहीम हाती घेऊन मारोती वाघमारे, अशोक देवकर, राजू विटकर, महादू कुऱ्हाडे (सर्व रा. डोंगरकडा) यांना अटक केली आहे.
येथे क्लिक करा - नांदेडला ‘कोरोना’चा तिसरा संशयीत
जागोजागी पडले खड्डे
या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अन्य दोघांचा शोध घेण्यासाठी आखाडा बाळापूर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. तर चौघांच्या घराची तपासणी करून मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, आखाडा बाळापूर ते नांदेड मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने उलटण्याचे प्रकार घडत आहेत. अनेक वाहने पंक्चर होण्याचे प्रमाणही वाढले आहे. पंक्चर झालेली वाहने उभी राहिल्यास अशा वाहनाच्या चालकांना लुटण्याच्या घटना घडत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.