Indrayani River: वाळूउपशाने केला घात, आष्टीतील युवकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू

Latest Alandi News: आईला एकुलता एक असलेल्या मुलाचा अशा प्रकारे करुण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Indrayani River: वाळूउपशाने केला घात, आष्टीतील युवकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू
Updated on

Latest Marathwada News: आळंदी येथे वेदशिक्षण घेणा-या आष्टीतील युवकाचा सोमवारी (ता. 19) इंद्रायणी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. प्रणव रमाकांत पोतदार (वय 17) असे मृत युवकाचे नाव असून, दोन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचेही निधन झालेले आहे. आईला एकुलता एक असलेल्या मुलाचा अशा प्रकारे करुण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आळंदीतील आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज संचलित वेदश्री तपोवन या गुरुकुलातील सुमारे 70 मुले श्रावणी पौर्णिमेनिमित्त सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नदीपूजनासाठी इंद्रायणी नदीच्या आळंदीनजीक असलेल्या मोशी-हवलदारवस्ती येथील नदीकाठावर गेली होती.

Indrayani River: वाळूउपशाने केला घात, आष्टीतील युवकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू
Indrayani River : पुन्हा फेसाळली ‘इंद्रायणी’ नदी

या वेळी नदीत उतरलेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रणव पोतदार, ओंकार श्रीकृष्ण पाठक (वय 16 वर्षे, रा. लातूर) व जय ओमप्रकाश दायमा (रा. वणी जि. नाशिक) हे तीन विद्यार्थी पाण्याच्या प्रवाहाने वाहत जाऊन बुडाले.

दोघांचे मृतदेह सोमवारी आढळून आले. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. मंगळवारी सकाळी प्रणवचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास आष्टी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संस्थेतील शिक्षक, विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Indrayani River: वाळूउपशाने केला घात, आष्टीतील युवकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू
Indrayani River Pollution : इंद्रायणी नदी प्रदूषणाचे खापर ग्रामपंचायतींवर

वाळूउपशाने पडलेल्या खड्ड्यांनी केला घात

श्रावणी पौर्णिमेनिमित्त संस्थेतील विद्यार्थी नदीपूजनासाठी नदीत उतरले. यावेळी दोघे पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाऊ लागले. तिस-या विद्यार्थ्याने त्यांना वाचविण्यासाठी आत उडी घेतली. दुर्दैवाने तिघांचाही मृत्यू झाला. इंद्रायणीचे डुडुळगाव, मोशी, आळंदी येथील नदीपात्र मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळूउपशाने धोकादायक बनले आहे. वाळूउपशामुळे अंतर्गत भवरे निर्माण झाले असून, पाणी संथ असले तरी आत खोलवर खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणांचा अंदाज न आल्याने या विद्यार्थ्यांचा घात झाला.

Indrayani River: वाळूउपशाने केला घात, आष्टीतील युवकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू
Indrayani River : इंद्रायणीत दररोज सहा अब्ज लिटर दूषित पाणी; राष्ट्रीय हरित लवादाला माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.