‘यांच्या’ सत्ता काळात झाली महिला अत्याचारात वाढ

Chakankar.jpg
Chakankar.jpg
Updated on

नांदेड : भाजप सरकारच्या काळात महिलांवर सर्वाधिक अत्याचार झाल्याचा आरोप करत फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद असताना महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या याचा लेखा-जोखा द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केले.

नांदेडमध्ये घेतली पत्रकार परिषद
नांदेडमध्ये मंगळवारी (ता.तीन) त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या वेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, प्रदेश सचिव वंदना चौधरी, माजी उपमहापौर डॉ. शीला कदम, प्रदेश सदस्या अ‍ॅड. कल्पना पाटील डोंगळीकर, महिला जिल्हाध्यक्षा इंजि. प्रांजली रावणगावकर, सुरेखा कदम, माहूर नगराध्यक्षा शीतल जाधव उपस्थित होत्या.


‘दिशा’ कायदा राबविणार
राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख रांनी ‘दिशा’ कायदा राबवून कारवाई करण्याची घोषणा केली आहे, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी पक्ष तालुकानिहाय महिला दक्षता समिती स्थापन करणार आहे. समिती पीडितांना पाठबळ देणार आहे. महिला सबलीकरण आणि सक्षमी करणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून लवकरच रोजना जाहीर होणार आहेत. 

हिंगणघाटनंतर मुद्दा एरणीवर
हिंगणघाट रेथील घटनेनंतर महिला अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या मुद्द्यावरुन सरकारवर टीका करीत आहेत. फडणवीस यांच्याकडे गृहखाते असताना पाच वर्षांत किती महिलांवर अत्याचार झाले याची आकडेवारी उपलब्ध आहे, असे त्या म्हणाल्या. गंभीर घटना घडल्यानंरत त्यांनी काय कारवाई केली? असा प्रश्‍न उपस्थित करून महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांचा त्यांनी समाचार घेतला.

बांगड्या घालणाऱ्या महिलांनी इतिहास घडविला
बांगड्या घालणे हे कमकुवतपणाचे लक्षण नाही, हेही देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवावे. माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई यांच्या हातातही बांगड्या होत्या. त्यांनी इतिहास घडविला, क्रांती केली असे म्हणत त्यांनी महिलांचा असा अपमान करणे थांबवावे अन्यथा महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, असेही त्या म्हणाल्या. या वेळी जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापूरकर, सय्यद मौला, रेखा राहेरे, एकनाथ वाघमारे, तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, कमलबाई लांडगे, जयश्री जिंदम, सुरेय्या बेगम, सईदा पटेल, महम्मदी पटेल, तातेराव पाटील आलेगावकर, विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम, मनबीरसिंघ ग्रंथी उपस्थित होते.

महिलांना भीती भाजपच्या लोकांपासून
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या लोकांविरुद्ध कारवाई करावी.
भाजपचे राम कदम, गिरीश महाजन, गिरीश बापट रांनी महिलांबद्दल अपशब्द वापरले. माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर त्यांच्याच पक्षातील एका महिला कार्यकर्त्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगीतले. या पदाधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सुधारावे, महाराष्ट्र आपोआप सुरक्षित होईल. महाराष्ट्रातील महिलांना सर्वाधिक भीती भाजपच्या लोकांपासून आहे. फडणवीस यांनी आधी भाजपच्या लोकांविरुद्ध कारवाई करावी, असा टोलाही त्यांनी श्रीमती चाकणकर यांनी लगावला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.