Beed News : ई केवायसी; एकाच दिवशी ७४० ठिकाणी मेळावे

सोमवारी जिल्हाभर कार्यक्रम ः कृषी विभागाचा पुढाकार
E KYC at 740 places on 2 october Initiative of Agriculture Department beed farmer
E KYC at 740 places on 2 october Initiative of Agriculture Department beed farmeresakal
Updated on

बीड : कृषी विभागाच्या पुढाकाराने ता. दोन ऑक्टोबर बीज प्रक्रिया व ई केवायसी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी जिल्हाभरात एकाच दिवशी ७४० ठिकाणी ई - केवायसी मेळावे होणार आहे.

याच दिवशी प्रत्येक कृषी सहाय्यक त्यांच्या कार्यक्षेत्रातील तीन गावांत बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवतील. तसेच पी.एम. किसानसाठी ई - केवायसी करून घेणार आहेत. गाव निवडताना प्रथमतः ग्रामपंचायत मुख्यालयाचे गाव घेतले जाईल.

सकाळी आठ वाजता पहिले गाव दुपारी एक वाजता दुसरे गाव आणि सायंकाळी साडेपाच वाजता तिसरे गाव अशा पद्धतीने एका दिवसात तीन गावांत मोहीम घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. गावांची संख्या जास्त असल्यास सदर मोहीम पुढील दोन दिवसांत राबविली जाणार आहे.

E KYC at 740 places on 2 october Initiative of Agriculture Department beed farmer
Beed News : माजलगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे जागरण-गोंधळ आंदोलन

काही गावांत कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी हे देखील शिबिर आयोजित करतील. दरम्यान, पी.एम. किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभ देण्यासाठी ई केवायसी आवश्यक आहे. अनेक शेतकरी ई केवायसी नसल्याने पी.एम. किसानच्या लाभापासून वंचित असल्याने कृषी विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे.

मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून कोणत्या गावात, कोणत्या दिवशी कोण क्षेत्रीय कर्मचारी बीज प्रक्रिया व ई केवायसी शिबिरासाठी उपस्थित राहणार याची यादी गावांतील शेतकऱ्यांच्या सोशलमीडिया ग्रुपवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

E KYC at 740 places on 2 october Initiative of Agriculture Department beed farmer
Beed : ‘होल वावर इज आवर’ म्हणत भरला पीकविमा २७४ बोगस शेतकऱ्यांची करामत ६४ कोटी हडपण्याचा डाव उघड

असे होतील तालुकानिहाय मेळावे

  • बीड : ११४

  • पाटोदा : ४१

  • आष्टी : ५९

  • शिरुर कासार : ४३

  • माजलगाव : ३३

  • गेवराई : ८१

  • धारुर : ५८

  • वडवणी : ३६

  • अंबाजोगाई : ९२

  • केज : १०८

  • परळी : ७५

  • एकूण : ७४०

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी ई केवायसी आवश्यक आहे. त्यामुळे दोन तारखेला ई केवायसी दिन साजरा करत ७४० गावांत एकाच दिवशी शिबिरे घेण्यात येणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.

- बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.