धाराशिव : ई - पीक पाहणी ॲपवर पिक नोंद करण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी उरला आहे. अशा स्थितीत पीक नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, ई - पिक पाहणी ॲपचा सर्व्हर डाउन असल्याने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही शेवटी पिकांची नोंद होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वारंवार प्रयत्न करून हैराण झाले आहेत.