Hingoli Earthquake : मराठवाड्याला भूकंपाचे धक्के! हिंगोली, नांदेड अन् परभणीमध्ये जाणवले हादरे

नांदेडमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला असून सकाळी 7 वाजून 14 मिनिटाला हा धक्का जाणवला. 4.2 Richter scale भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात दाखवत आहे. भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. अनेकजण या धक्क्यामुळे घराबाहेर पडले होते.
Earthquake
Earthquakeesakal
Updated on

हिंगोलीः हिंगोलीसह नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून भूकंपाच्या धक्क्यामुळे प्रशासनदेखील अलर्ट मोडवर आलेलं आहे.

हिंगोलीतल्या औंढा, हिंगोली, वसमत हा भाग भूकंपाने हादरला. तसेच जिल्ह्यातील इतरही भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

दुसरीकडे नांदेडमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला असून सकाळी 7 वाजून 14 मिनिटाला हा धक्का जाणवला. 4.2 Richter scale भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात दाखवत आहे. भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. अनेकजण या धक्क्यामुळे घराबाहेर पडले होते.

Earthquake
Maratha Reservation: "त्यांची राजकीय जात ओळखू येते"; आरक्षणविषयक बैठकीला दांडी मारणाऱ्या विरोधकांवर फडणवीस भडकले

परभणीतही भूकंपाचा सौम्य धक्का

परभणीत भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी 4.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. भूकंपाचं केंद्र हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून या भूकंपाचे धक्के परभणी जिल्ह्यातील अनेक भागात जाणवले. त्यामुळे नागरिक भीतीने घरबाहेर पडले. धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाच्या धक्क्यामुळे सर्वत्र भीती पसरली आहे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या पाचोड परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बुधवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास धक्के बसल्याचा नागरिकांचा दावा आहे.

दुसरीकडे जालन्यातल्या काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यात काही गावांमध्ये सकाळी ७.१५ ते ७.१८ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याचे नागरिकांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.