Earthquake : धक्कादायक! लातूरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के,नागरिक भयभीत

लातूरमधील काही गावांत अनेकदा भुकंपाचे धक्के जाणवले
earthquake
earthquake esakal
Updated on

निलंगा : गेल्या महीनाभरा पासून निलंगा तालुक्यातील हासोरी, उस्तुरी,बडुर या गावाला भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब झाली असून प्रशासकडून अद्याप उपाय-योजना दिसत नाहीत. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच शासनाचे डोळे उघडणार का? असा सवाल ग्रामस्थाकडून विचारला जात आहे.

earthquake
Earthquake: किल्लारीच्या आठवणी ताज्या; निलंगा तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के

महीना भरापासून हासोरी गावाला अधूनमधून भुकंपाचे धक्के जाणवत असून शनिवारी ता.8 रोजी शनिवार रात्री एक वाजून तेरा मिनिटाला, एक वाजून चवदा तर ,एक वाजून सत्तावन मिनिटाला असे तीन भुकंपाचे धक्के जाणवले हे धक्के ( 2.1 रिश्टर ) एवढे होते तर रविवारी ता. ९ रोजी 9.57 वाजता 1.9 रिश्टर धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिक रात्र जागून काढत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांची ऐनवेळी सोय व्हावी म्हणून कापडी टेंन्ट मारले होते. मात्र त्यामध्ये नागरिक थांबण्यास तयार नाहीत असलेले टेंन्टही वानराने फाडून टाकले आहे. प्रशासनाकडून त्वरीत ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

earthquake
Earthquake : रशियात भूकंप, एकाचा मृत्यू; घटनेचा थरारक Video आला समोर

याबाबत तहसीलदार सुरेख घोळवे म्हणाले की, महीनाभर झाले अधूनमधून भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत होत असून याबाबत ठोस उपाय व्हावा म्हणून आज वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. सध्या गावात प्रशासकीय आधिकारी मंडळआधिकारी व तलाठी यांना थांबण्याच्य सूचना देण्यात आल्या आहेत.

earthquake
Earthquake : तैवानमध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप, 24 तासांत दुसऱ्यांदा हादरे

गेल्या दोन दिवसापासून चार वेळा भूकंपाचे धक्के बसले असून यामुळे आम्ही गेल्या एक ते दीड महिन्यापासून गावातील सर्वजण रात्री जागून काढत आहोत.या कडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.तरी मोठा अनर्थ होण्याच्या अगोदर शासनाने उपाय योजना कराव्या अशी आमची मागणी आहे.

- कल्याण बरमदे,नागरिक हासोरी

earthquake
Earthquake : महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के; जाणून घ्या, किती होती तीव्रता

गेल्या दीड महिन्या पासून भूकंपाचे धक्के आमच्या गावाला बसत आहेत.सुरुवातीला तर शासनाने भुकंपच नाही असे सिद्ध केले.मात्र गेल्या दीड महिन्यात दहा ते बारा वेळा धक्के बसले आहेत.तरीही सरकारला जाग येत नाही.आम्ही आमचा जीव मुठीत धरून जगत आहोत त्याकरिता शासनाने त्वरित या कडे लक्ष द्यावे.याकडे लक्ष दिले नाही तर आम्ही जण आंदोलन करणार आहे यासाठी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहे

- सचिन आरेकर,उपसरपंच हासोरी ,ता.निलंगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.