गुटख्याने भरलेल्या कारला पोलिसांनी पकडले

file photo
file photo
Updated on

पूर्णा (जि.परभणी) : चुडावा चेक पॉईंटवर पोलिसांच्या बॅरेकेट्स उडवून लावत सुसाट धावणाऱ्या गुटख्याने भरलेल्या कारला पूर्णा पोलिसांनी धाडसाने पकडले. ही घटना सोमवारी (ता. १३) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या वेळी कारसह असा अंदाजे आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
नांदेड येथून पूर्णाकडे येणाऱ्या कारला (एमएच २६ - एच १४११) वसमत फाटा येथे असलेल्या चेक पोस्टवर सोमवारी (ता. १३ ) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास फौजदार मारोती चव्हाण यांच्या नाकाबंदी पथकातील श्री. बबिलवार यांनी तपासणीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, कारचालकाने लावण्यात आलेले बॅरेकेट्स तोडून कार सुसाट पळविली. पुढे पाठलाग केला असता गुंगारा दिला. नऱ्हापूर येथे पोलिस शिपाई श्री. टाक यांनी सदरील वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्यांनाही गुंगारा दिला. 

हेही वाचा - परभणीच्या महापौर, उपमहापौरांवर गुन्हा
धनगर टाकळी फाटा येथे साफळा रचला

दरम्यान, ही माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी देवकते व मारोती चव्हाण यांनी पूर्णा येथील सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांना कळविली. धुमाळ यांनी समीरखान पठाण, गिरीष चन्नावार, अक्षय वाघ यांना सोबत घेऊन धनगर टाकळी फाटा येथे साफळा रचला. त्यांनी नांदेड-पूर्णा रस्त्यावर वाहने आडवी लावली. सदरील कारजवळ आल्यावर चालकाच्या ही बाब लक्षात येताच तो रस्त्यात सोडून पळून गेला. पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्या सुमारे तीन लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. यात आरएमडी गुटखा आठ खोके, गोवा गुटखा एक मोठे पोते , हिरा, ७०७ मिक्स मोठे पोते, सिगारेट बॉक्स आढळून आले. कारसह असा अंदाजे आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त करून तो चुडावा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. अन्नसुरक्षा विभागास या बाबत कळविण्यात आले. जप्त सामग्रीची अधिकृत किंमत काढतील त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी देवकते यांनी सांगितले.

वाळूसह टिप्पर जप्त
दरम्यान, सकाळी आठ वाजता गस्त घालत असताना सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी देवकते यांनी चुडावा कावलगाव रस्त्यावर चांगेफळ फाट्याजवळ टिप्पर (एमएच १२ - टीएस २०६३) हे अवैधरीत्या वाळू घेऊन जाताना पकडले. टिप्परचा चालक सय्यद इब्राहिम व मालक यांच्या विरोधात गौण खनिज कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून वाळूसह साडेचार लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपयांची किंमत असलेले टिप्पर जप्त केले आहे. चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.