Eknath Shinde: मुंडेंच्या बीडमध्ये शिंदेंनी दिला ठाकरेंना धक्का, या बड्या नेत्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

Shivsena: गेल्या दोन वर्षात घेतलेला प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी घेतला आहे.
Eknath Shinde: मुंडेंच्या बीडमध्ये शिंदेंनी दिला ठाकरेंना धक्का, या बड्या नेत्यांनी केला शिवसेनेत प्रवेश
Updated on

Beed: शिवसेनेला (उबाठा) सुरुंग लावण्यात शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप आणि जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांना यश आले. महिला आघाडी जिल्हा प्रमुख व राज्य महिला आयोगाच्या सदस्य अॅड. संगीता चव्हाण यांच्यासह युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रविराज बडे व गजानन कदम यांनी समर्थकांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.

मुंबईत मुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी या पदाधिकाऱ्यांना पक्षात ्रपवेश दिला. एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकार सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे सरकार आहे. गेल्या दोन वर्षात घेतलेला प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी घेतला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला अधिक मजबूत करावे.

Eknath Shinde: मुंडेंच्या बीडमध्ये शिंदेंनी दिला ठाकरेंना धक्का, या बड्या नेत्यांनी केला शिवसेनेत प्रवेश
Eknath Shinde : 'अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहणार'; मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं आश्वासन

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार भरत गोगावले, शिवसेना उपनेत्या कमला शिंदे, शिवसेना जिल्हा ्रपमुख अनिल जगताप, सचिन मुळूक आदी उपस्थित होते. यावेळी अमोल जाधव, सचिन जाधव, संतोष ललवाणी, दिपकचंद्र शेनोरे, दिपक कदम, शैलेश कासार, जगदीश वखरे, अक्षय घल्लाळ, ओम आगलावे, प्रवीण लांडगे, यश लांडगे, सचिन उडान, अमन भालेकर, नाना शिंदे, गणेश उडान, मेघनाथ काळे, आदित्य जाधव, स्वयम् पवार, अभी तीठे, जयदत्त किरकत, राजेंद्र सानवटे, रामेश्वर किरकट आदी तालुका ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनीही ्रपवेश केला.

Eknath Shinde: मुंडेंच्या बीडमध्ये शिंदेंनी दिला ठाकरेंना धक्का, या बड्या नेत्यांनी केला शिवसेनेत प्रवेश
Eknath Shinde: माझा भाऊ मुख्यमंत्री आहे म्हणत, ठाकरेंच्या महिला उपनेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.