Latest Phulambri News: फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये भाजपच्या ताब्यात आहे. आतापर्यंत पाच वेळा भाजपने या मतदारसंघात वर्चस्व ठेवले आहे. परंतु आता या भाजपच्या ताब्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघाला सुरुंग लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन पैलवान मागील गेल्या सहा महिन्यापासून अपक्षाची तयारी करीत आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात शिंदे सेनेचे इच्छुक उमेदवार पूर्ण ताकदीनिशी उतरले आहे.