लोहारा : महावितरण कंपनीने चालू आर्थिक वर्षात विजेची मोठी दरवाढ करून सर्वसामान्य ग्राहकांना एकप्रकारे ‘शॉक’च दिला आहे. दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. झालेली दरवाढ परवडत नसल्याने सामान्य ग्राहक हतबल झाला असून वीज दरवाढ कमी करावी, अशी मागणी होत आहे.