Fire News: अहमदपूरमध्ये अकरा दुकाने जळून खाक, अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान

Fire News: शहरातील शिवाजी चौक परिसरात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागून आकरा दुकाने जळून खाक झाले असून यामध्ये दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Fire News
Fire NewsEsakal
Updated on

अहमदपूर: शहरातील शिवाजी चौक परिसरातील सराफा रस्त्यावर असलेल्या पत्राच्या दुकानास रविवार (ता. सात ) पहाटे चारच्या दरम्यान अचानक आग लागली या आगीमध्ये 11 दुकाने जळून खाक झाले आहेत.यामध्ये स्वीट मार्ट, किराणा, दातांचा दवाखाना, प्लास्टिक पाईप, सौंदर्य प्रसाधने अशा दुकानांचा समावेश आहे.

पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटास अग्निशामन दलाची गाडी बोलवण्यात आली त्यानुसार अहमदपूर शहरातील अग्निशामन दलाचे कर्मचारी कैलास सोनकांबळे, प्रकाश जाधव, प्रशांत गायकवाड, अजित लाळे हे घटनास्थळी दाखल झाले तर नंतर उदगीर, चाकूर, लोहा या ठिकाणाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उपस्थित होती.

Fire News
Jalgaon Lok Sabha Election : जळगाव लोकसभेच्या मैदानात ठाकरेंनी उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती? स्मिता वाघ यांना देणार मोठी टक्कर?

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन तासाचे अथक प्रयत्न करावे लागले. आग विझवत असताना कैलास सोनकांबळे व राहुल गायकवाड यांच्या हताला भाजल आहे.

Fire News
Pravin Mane join Ajit Pawar group: निवडणुकीपुर्वी सुप्रिया सुळेंना धक्का! प्रवीण मानेंनी सोडली साथ, स्वत:च केलं स्पष्ट

जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी काम करणा-या अग्निशामकाच्या जीवाचे संरक्षण मात्र रामभरोसे

अग्निशामकाच्या पोशाखात एक स्वयंपूर्ण श्वास, श्वासोच्छ्वासाचे उपकरण, एक बेल्ट, एक फ्लॅशलाईट, एक ज्योत सुरक्षा दिवा, एक कठोर हेल्मेट, हातमोजे व संरक्षणात्मक कपडे आणि एक फायर कुर्हाड असणे आवश्यक असताना सुद्धा यापैकी कुठल्याही साहित्याची उपलब्धता येथील फायरमन कडे नव्हती.

Fire News
Supriya Sule: सुप्रिया सुळेंना बारामतीत धक्का! प्रवीण माने सुनेत्रा पवारांना देणार पाठिंबा? आज स्पष्ट करणार भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.