अपघात झाल्यानंतर प्रकरण दाबण्याचा दोन्ही बाजूने प्रयत्न झाला आहे. घटस्थळी वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अरेरावी करत छायाचित्र आणि चलचित्र घेण्यापासून रोखण्यात आले.
जालना : शहरातील अंबड चौफुली परिसरात पोलिस व्हॅनने (Police Van) स्कूल बसला (School Bus) मंगळवारी (ता. सहा) सकाळी सात वाजेच्या सुमारास धडक दिली. या अपघातात अकरा विद्यार्थी आणि स्कूल बस चालक जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, अपघाताचा पंचनामा होण्यापूर्वीच दोन्ही अपघातग्रस्त वाहने गायब करण्यात आली.
शहरातील अंबड चौफुली परिसरातून विद्यार्थी शाळेमध्ये घेऊन जाण्यासाठी गांधी चमन परिसरातील किड्स कॅम्ब्रेजची इंग्लिश स्कूलची बस (English School Bus) निघाली होती. अंबड चौफुली क्रॉस करत असताना पोलिस प्रशासनाच्या एसआरपीएफची तुकडी घेऊन निघालेल्या वाहनाने जोराची धडक दिली. त्यामुळे स्कूल बस पलटी झाली.
या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना पोलिस व्हॅनमधील पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाहेर काढत शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या अकरा विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, तीन विद्यार्थ्यांना जबर मार लागल्याने त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही वाहन चालकांवर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी दिली आहे.
अपघात झाल्यानंतर प्रकरण दाबण्याचा दोन्ही बाजूने प्रयत्न झाला आहे. घटस्थळी वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अरेरावी करत छायाचित्र आणि चलचित्र घेण्यापासून रोखण्यात आले. तसेच रुग्णालयातील पत्रकारांना अरेरावी करत छायाचित्र घेण्यापासून मज्जाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.