येरमाळा : २८४ वटवृक्ष लागवड करुन मुलाबाळा प्रमाणे सांगोपन करुन डेरेदार वृक्ष होई पर्यंत सांभाळ करण्याऱ्या कर्नाटकातील थिमक्काची अमेरिकेने घेतली दखल, थिमक्काचा उपक्रम सोशल मीडियावरील पर्यावरण, ऍग्रीकल्चर ग्रुपवर व्हायरलं.
एकीकडे भारतातील बहुसंख्य लोक परदेशी जाऊन त्या त्या देशाचे नागरिकत्व स्विकारात आहेत. गेल्या कांही वर्षात अशा असंख्य भारतीयांनी आपल्या देशाचे पार्यावरण धोक्यात असल्याने आपण देश सोडत असल्याचे एका सर्वेत म्हंटले आहे.
कारण आपल्या देशात पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास,बेसुमार वृक्ष तोडीच्या तुलनेत वृक्ष लागवड होत नसल्याने वाढत्या ग्लोबल वॉर्मिंग भविष्यात लवकर मोठे पर्यावरण संकट ओढवणार आहे.यामुळे देश सोडणारे भारतीय तर दुसरीकडे
दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दोन्ही बाजूने चार कि.मी.पर्यंत चक्क २८४ वडाची झाडं लावली आणि त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं.
त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवलं अन आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय.थिमक्का सध्या त्यांच्या कार्याची दखल अमेरिकेने घेतल्याने चर्चेचा विषय ठरत आहेत.त्यांचा उपक्रम सध्या सोशल मीडियाच्या पर्यावरण, ऍग्रीकल्चर ग्रुपवर प्रचंड व्हायरल होत आहे.
थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेने घेतलीय आणि वृक्ष लागवड पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण "थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन" असं करण्यात आलंय.
थिमक्काच्या या कार्याची दखल घेत प्रत्येक भारतीयांनी एक झाड लावुन त्याचे संगोपन करावे असेच आहे. प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्का सारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे.
ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल.तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा अन त्याचा सांभाळ करा. थिमक्का जर वडाची झाडं लावून वाढवू शकते तर प्रत्येक भारतीय नागरिक एक तरी झाड नक्कीच लावून वाढवू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.