School Uniform : स्वातंत्र्य दिन जवळ येऊन ठेपला तरी गेवराईत २३ हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही

स्वातंत्र्य दिन जवळ येऊन ठेपला तरी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आलेला नाही.
even Independence day 23 thousand students in Gevrai did not get school uniform
even Independence day 23 thousand students in Gevrai did not get school uniformSakal
Updated on

Beed News : स्वातंत्र्य दिन जवळ येऊन ठेपला तरी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आलेला नाही.यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होऊन दोन महिने उलटून गेले असून,ना गणवेश, ना बुट, अन् मोजे यामुळे जुन्याच गणवेशात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची वेळ आलेली आहे.

पूर्वि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा गणवेश निधी शालेय समिती व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्या मार्फत खर्ची करण्यात येत होता.यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शासनाकडून कापड देत महिला बचत गटाकडून गणवेश शिवून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

even Independence day 23 thousand students in Gevrai did not get school uniform
School Uniform : राज्यात सरकारी शाळा गणवेशाविनाच सुरू;विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास उजाडणार जुलै महिना

गेवराई तालुक्यातील साधारण २२३ प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेले पहिली ते आठवीपर्यंतचे २३ हजार विद्यार्थी दोन महिने झाले तरी गणवेशापासून वंचित आहेत. त्यातच यंदा बुट आणि मोजे याचा ही समावेश करण्यात आला असून, देशाचा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशात साजरा करावा लागणार आहे.

even Independence day 23 thousand students in Gevrai did not get school uniform
School Uniform News : विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानंतर गणवेश देणार का? पालकांचा सवाल

बुट मोजे ही नाही

यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत बुट आणि मोजे देण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रती विद्यार्थी १७० रुपयाचा निधी देखील वर्ग करण्यात आला.एवढेच नाहीतर विद्यार्थ्यांचे मापे नेली असताना गणवेश तर नाहीच बुट मोजे ही आद्याप तरी प्राथमिक शाळेत पोहचवली नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.