हिंगोली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नदी-नाले काठावरील गावे, शेतीपिकांचे आणि रस्ते, पूल बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करावेत.
यामध्ये एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश अल्पसंख्यांक विकास, औकाफ, पणन मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला मंगळवारी (ता. दोन) दिले.