लातूर : लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्या नुसार जिल्ह्याला बुधवारी (ता. १४) रात्री पावसाने चांगलेच झोडपले. यात ३५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे तर दहा मंडळात १०० मिलीमिटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात निलंगा तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. रात्रीतून या तालुक्यात ११० मिलीमिटर पाऊस झाला आहे. याचा शेतात असलेल्या खरीपाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ८५९.४ मिलीमीटर म्हणजे ११५.४ टक्के पाऊस झाला आहे. त्यात लातूर तालुक्यात १०२.५ टक्के, औसा १४०.४ टक्के, अहमदपूर १०८.६ टक्के, निलंगा १३२.३ टक्के, उदगीर ११४.८ टक्के, चाकूर ९४.२ टक्के, रेणापूर ११६ टक्के, देवणी १४४.१ ट्कके, शिरुर अनंतपाळ १२३.९ टक्के, जळकोट १२३.५ टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी ६८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यात लातूर ५६.४, औसा ८१.६, अहमदपूर २८, निलंगा ११०.८, उदगीर ६४.८, चाकूर ६५.३, रेणापूर ३४.९, देवणी ९०.४, शिरुर अनंतपाळ ७९.४, जळकोट तालुक्यात २५.४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. यात ३५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
महसूल मंडळनिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे -
जिल्ह्यात सध्या खरीप पिके काढण्याचे काम सुरु आहे. त्यात सोयाबीन महत्वाचे आहे. अनेक शेतकऱयांनी शेतातच सोयाबीनच्या बनिम रचून ठेवले आहे. या अतिवृष्टीमुळे त्याला मात्र फटका बसला आहे.
चोवीस तासात पडला शंभर मिलीमिटरपेक्षा अधिक पाऊस
जिल्ह्यातील दहा महसूल मंडळात चोवीस तासात शंभर मिलीमिटर पेक्षा अधिक पाऊस पडला. त्यात लामजना १०५, किल्लारी १०७.८, निलंगा १२५, कासारबालकुंदा १४५.३, अंबुलगा १२४.८, मदनसुरी १०७.८, कासारशिरसी १२४.५, हलगरा ११४.३, भूतमुगळी १२२.३ वलांडी मंडळात १०१.८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
(संपादन-प्रताप अवचार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.