नांदेड : कोरोना व्हायरस आणि जिवनावर पडत असलेले विपरीत परिणाम हे नागरिकांच्या मनाला चटका लावून जाणारे ठरत आहेत. कोठे साधा आजार असलातरी त्या आजारी व्यक्तीची विचारपूस करण्यासाठी आज कोरोनाच्या धास्तीने कोणीही पुढे येत नाही. एवढेच काय तर एखाद्याचा मृत्यू झाला तर जवळचे असलेले नातलगही त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला पोहचू शकत नाही किंवा जावू शकत नाही. त्यामुळे कोरोना हा आजार नात्यांचे अस्तीत्वच संपुष्टात आणणारा ठरत आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये एखाद्या नातेवाईकाचा अपघात झाला, आॅपरेशन झाले, दुखापत झाली किंवा फारकाळ आजारी आहे असा फक्त निरोप जरी आला तरी नातेवाईक व भाऊबंद, स्नेहीजन तातडीने त्याच्या भेटीकरीता धावून जातात. त्याही पलीकडे जर एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्याच्या अंत्यसंस्काराकरीता लांबपल्ल्याच्या ठिकाणांवरून नातेवाईक तर येतातच शेजारीही आपल्या परिवारातीलच सदस्य गेल्याचे दुःख मनाशी बाळगून संपूर्ण दिवसच त्या कुटुंबाच्या मदतीसाठी धावून येतात. तर जाणाऱ्या माणसाचे शेवटचे दर्शन व्हावे याकरीता लांब पल्ल्यावरून येणाऱ्या नातेवाईकांकरीता त्या निधन झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे थांबविले जातात, ही परंपरा पुर्वाकाळापासूनची आजही सुरुच आहे.
मात्र गेल्या काही महिन्यापासून जगामध्ये कोरोना या संसर्ग विषाणू रोगाने धुमाकूळ घातल्याने हा धुमाकुळ भारतात सुद्धा पोहचला. या कोरोनाची धास्ती एवढी आहे की त्याची लागन ज्याला झाली त्याचा शेवट मृत्यूच आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपली व आपल्या परिवाराची काळजी घेताना दिसत आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये, घराघरामध्ये, नातेवाईकांमध्ये, आप्तेष्ट, भाऊबंदकी, स्नेही जणांमधील कोणी आजारी जरी पडले तर त्यास कोरोना झाला की काय? हाच प्रश्न आधी मनामध्ये येत आहे. मात्र, काही वेळा तो साधा आजारी असलातरी कोरोनाची धास्ती असल्याने त्याच्या तब्येतीची पाहणी करावयासही कोणी धजावताना दिसत नाही. हीच परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या धास्तीमुळे समाजात दिसून येत आहे.
येथे क्लिक करा - निफा - `सप्तरंग’च्या मानुसकीचे दर्शन
कोरोनाची धास्ती अन संपूर्ण देशात लावण्यात आलेला लाॅक डाऊन अशा कठीण प्रसंगी एखाद्याचा कोरोना व्यतिरिक्त अन्य आजाराने जरी मृत्यू झाला तरी अनेकांच्या मनात कोरोनाची धास्ती निर्माण होवून त्याच्या अंत्यसंस्काराला जाणे टाळले जात आहे. काहींनी तर कोरोनामुळे अंतीम संस्काराला फक्त जवळचे कुटुंबातीलच बोटावर मोजता येतील एवढ्या व्यक्तींनीच यावे, असेही स्पष्टपणे सांगितले जात आहे. मॅसेज पाठविण्याचे प्रकारही घडत आहेत. तर शासनाने सुद्धा उपाययोजना म्हणून अंतीम संस्कारावेळी केवळ २० जणांचा सहभाग असावा असे बंधनही आणले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.