कॉंग्रेसच्या दहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; कोणत्या पक्षात जाणार? जिल्ह्याचे लागले लक्ष

नगरपंचायतीच्या स्थापनेपासून आतापर्यंत कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केल्याचा ठपका ठेवून १० नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
कॉंग्रेसच्या दहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी
कॉंग्रेसच्या दहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टीsakal
Updated on

नगरपंचायतीच्या स्थापनेपासून आतापर्यंत कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केल्याचा ठपका ठेवून १० नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

या निर्णयामुळे नगरपंचायतीच्या सत्तेतून कॉंग्रेस हद्दपार झाली आहे. अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. पक्षातून हकालपट्टी केलेले नगरसेवक अधिकृतपणे कोणत्या पक्षात प्रवेश करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. १० नगरसेवक खासदार अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

भोकर विधानसभा मतदारसंघात अर्धापूर, मुदखेड, भोकर या तीन तालुक्यांचा समावेश होता. या मतदारसंघात अशोक चव्हाण यांचे वर्चस्व राहिले आहे. अर्धापूर शहराचा विकास व्हावा, यासाठी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीच्या दर्जा देण्यात आला.

या नगरपंचायतीची पहिली निवडणूक २०११ मध्ये झाली. निवडणुकीत काँग्रेसचे १७ पैकी १५ नगरसेवक निवडून आले होते. तर २०१६ व २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत दहा नगरसेवक निवडून आले. अशोक चव्हाण यांनी सहा महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी भाजपात प्रवेश केला. अर्धापूर शहरातील नगरसेवकांनी भाजपचा प्रचार केल्याचा ठपका ठेवून दहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या नगरपंचायतीमध्ये कॉंग्रेसचा एकही नगरसेवक राहिला नाही. ही जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई आहे.

लोकसभा निवडणुकीत दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांना अर्धापूर शहरात मोठे माताधिक्य मिळाले होते. कॉंग्रेसमध्ये अशोक चव्हाण नसतानाही हे मताधिक्य मिळाले होते. शहरातील कॉंग्रेसच्या पारंपारिक मतदारांनी पक्षाची साथ सोडली नाही.

आज हा मतदार कॉंग्रेससोबत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसने खूप मोठी जोखीम घेऊन या दहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यात विद्यमान नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा समावेश आहे.

भाजपत गेल्यास पक्षाला फायदा

अर्धापूर शहरातील समीकरण पाहता कॉंग्रेसला पोषक वातावरण राहिले आहे. गेल्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी पाहिली तर कॉंग्रेस आघाडीवर राहिले. भाजपचा मतदार ठराविक असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. दहा नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यास पक्षाला फायदा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.