Parbhani Weather : परभणी गारठली ! शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट

परभणी जिल्ह्यात यंदा थंडीला थोड्या उशिराने सुरुवात झाली.
Parbhani Weather
Parbhani Weatheresakal
Updated on

परभणी : परभणी शहरासह जिल्ह्याभरात थंडीची लाट आली असून सोमवारी (ता.२०) या वर्षीच्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली. सोमवारी सकाळी कृषी विद्यापीठात (Agriculture University) नोंद घेण्यात आली. त्यात किमान ९.५ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदले गेले आहे. त्यामुळे परभणीकरांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यात यंदा थंडीला थोड्या उशिराने सुरुवात झाली. ऐन दिवाळीत पावसाचे आगमन झाल्याने थंडी काही काळासाठी पुढे ढकलली गेली होती. आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणीचे किमान तापमान १० अंशांपर्यंत आले आहे. (Extreme Cold Weather In Parbhani And District)

Parbhani Weather
अमित देशमुखांची 'ट्वेंटी वन शुगर्स' उस्मानाबाद बँकेविरुद्ध उच्च न्यायालयात

त्यात आज सोमवारी किमान ९.५ अंश एवढ्या निच्चांकी तापमानाची नोंद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (Vasantrao Naik Marathwada Agriculture University) हवामानशास्त्र विभागात झाली आहे. या वर्षातील हे आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान असून यापुढे त्यात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, पोलिस ग्रॉऊंड, वसमत रोड, जिंतूर रोड, नांदखेड रोड, गंगाखेड रोड या परिसरात सकाळी नागरिकांनी मॉर्निंग वॉकसाठी गर्दी दिसून येत आहे.

Parbhani Weather
Aurangabad : औरंगाबादच्या एकाला ओमिक्राॅनची बाधा,आरोग्य यंत्रणा सतर्क

निच्चांकी तापमानाचा इतिहास

मराठवाड्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद परभणीत होत असते. त्या प्रमाणेच किमान तापमानाची देखील नोंद येथेच झालेली आहे. किमान २ अंश इतकी निच्चांकी तापमानाची नोंद २९ डिसेंबर २०१८ रोजी झाली होती. या प्रमाणेच १७ जानेवारी २००३ ला किमान २.८ आणि १८ डिसेंबर २०१४ रोजी किमान ३.६ अंश एवढ्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.