माजलगाव : गौरी गणपतीच्या सणाला सुरवात झाली असून पुणे, मुंबईसह इतर ठिकाणी ये-जा करणाऱ्यांची गर्दी वाढली तशी ट्रॅव्हल्स वाल्यांनी तिकीटामध्ये भरमसाठ वाढ केली असून माजलगाव-पुणे तिकीट हजार ते बाराशे रूपयांपर्यंत केले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे.