शेतमजुराच्या लेकीला मिळाली दृष्टी, डोळ्यांतून आनंदाश्रू ढाळत!

लातूर : इळेगाव (ता. गंगाखेड) येथील मनीषा धापसे या मुलीवर येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी दिशा प्रतिष्ठानचे अभिजित देशमुख, ॲड. वैशाली यादव, नगरसेवक श्वेता लोंढे.
लातूर : इळेगाव (ता. गंगाखेड) येथील मनीषा धापसे या मुलीवर येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी दिशा प्रतिष्ठानचे अभिजित देशमुख, ॲड. वैशाली यादव, नगरसेवक श्वेता लोंढे. सकाळ
Updated on

लातूर : मोलमजुरी करून कुटुंबातल्या सदस्यांची पोटं भरायची आणि रोजचा दिवस ढकलायचा, अशी परिस्थिती असलेल्या कुटुंबात एखाद्याला आजारपण यावे अन् त्याच्या जीवाला धोका निर्माण व्हावा आणि कुणी तरी देवासारखे येऊन त्यांना आधार देत त्यांचा जीव वाचवावा. अशी एक घटना येथे घडली आहे. इळेगाव (ता. गंगाखेड) (Gangakhed) येथील शेतमजूर कुटुंबातील १७ वर्षीय तरुणीला मेंदूत ट्यूमर (Brain Tumar) होऊन तिची दृष्टी (Eye Sight) गेली. जिवाला धोका निर्माण झाला. अशा वेळी लातूरच्या (Latur) दिशा प्रतिष्ठानने या कुटुंबाला व तरुणीला आधार देत तिच्या उपचाराचा खर्च उचलला आणि तिला केवळ दृष्टीच नाही, तर आयुष्य पुन्हा नव्याने मिळाले. इळेगाव (ता. गंगाखेड) येथे अंकुश धापसे हे पत्नी शांता यांच्यासह शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.(farm labourer daughter get sight latur news glp88)

लातूर : इळेगाव (ता. गंगाखेड) येथील मनीषा धापसे या मुलीवर येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी दिशा प्रतिष्ठानचे अभिजित देशमुख, ॲड. वैशाली यादव, नगरसेवक श्वेता लोंढे.
मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप

दीड महिन्यापूर्वी त्यांची १७ वर्षीय मुलगी मनीषा हिला ताप आला. सुरुवातीला प्राथमिक उपचार केले, मात्र त्याने फरक पडला नाही. तेव्हा २० हजारांचे कर्ज काढून तिला परभणी आणि नांदेड येथे उपचारासाठी नेले. मात्र, तरीही मनीषाच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. यात दीड महिन्याचा काळ गेला. ताप मनीषाच्या मेंदूला भिनला आणि मेंदूत ट्युमर तयार झाला. मेंदूतील रक्तवाहिन्या सुकून तिची दृष्टी गेली.आता हा आजार तिच्या जिवावर बेतणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, लातुरात नोकरीनिमित्त स्थायिक असलेल्या व मूळचे इळेगावचे असलेल्या गंगाधर पवार यांना गावी गेल्यानंतर ही घटना समजली. त्यांनी मनीषाला लातूरला आणण्याचा सल्ला तिच्या पालकांना दिला. ता. १५ जुलैला तिला लातुरात आणल्यानंतर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये डॉ. हनुमंत किणीकर यांच्याकडे उपचार सुरू केले. मात्र, डॉक्टरांनी सांगितलेला खर्च या हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा होता. डॉक्टरांनी तिला मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, मुंबई विषयी काहीच माहिती नसल्याने ते असमर्थ होते.

लातूर : इळेगाव (ता. गंगाखेड) येथील मनीषा धापसे या मुलीवर येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी दिशा प्रतिष्ठानचे अभिजित देशमुख, ॲड. वैशाली यादव, नगरसेवक श्वेता लोंढे.
अल्पवयीन मुलांना पॉर्नचे आकर्षण, नोटिफिकेशन्सने लक्ष विचलित

ही बाब दिशा प्रतिष्ठानच्या ॲड. वैशाली यादव व नगरसेवक श्वेता लोंढे यांना समजली. त्यांनी दिशा प्रतिष्ठानचे प्रवर्तक अभिजित देशमुख यांना याची कल्पना दिली. सर्वांनी मिळून रुग्णालयात जाऊन मनीषा व तिच्या नातेवाइकांची भेट घेत परिस्थिती समजून घेतली. उपचाराचा खर्च आपण उचलणार असल्याचा शब्द त्यांनी मनीषाच्या कुटुंबीयांना दिला. डॉक्टरांनीही आपल्याबाजूने सहकार्याचा शब्द दिला. त्यानुसार सह्याद्री हॉस्पिटलमध्येच डॉक्टरांनी मनीषावर उपचार सुरू केले. खरी परीक्षा तर पुढे होती. तिचा ट्यूमर काढायचा होता. शस्त्रक्रियेनंतर मनीषाची दृष्टी परत येईलच, याची शाश्वती नव्हती. पण, तिचा जीव वाचवणे हे डॉक्टरांसाठी महत्त्वाचे होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. यावेळी वेळी रक्ताची गरज भासली, त्यासाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनने मदत केली. डॉक्टरांच्या उपचाराला अन् सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि भावी आयुष्याची स्वप्ने रंगवायच्या वयात नशिबी अंधत्व आलेल्या मनीषाची गेलेली दृष्टी तर परत आलीच; मात्र जिवावर बेतलेले हे संकट टळून तिला नवे आयुष्य मिळाले.

लातूर : इळेगाव (ता. गंगाखेड) येथील मनीषा धापसे या मुलीवर येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी दिशा प्रतिष्ठानचे अभिजित देशमुख, ॲड. वैशाली यादव, नगरसेवक श्वेता लोंढे.
नांदेडमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट, फक्त ५ जण पाॅझिटिव्ह

तिच्यासह पालकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. केवळ आर्थिक मदत करून दिशा प्रतिष्ठान थांबले नाही तर त्यांनी या कुटुंबीयांची, मनीषाची सतत चौकशी करून त्यांना मायेचा आधार दिला. यासाठी मनीषा आणि तिच्या पालकांनी डॉक्टर, तसेच मदत करणाऱ्या दिशा प्रतिष्ठानसह सर्वांचे आभार आपल्या डोळ्यांतून आनंदाश्रू ढाळत मानले. यावेळी दिशा प्रतिष्ठानच्या सदस्यांनाही आपल्या भावला अनावर झाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()