पीककर्ज न मिळाल्याने शेतकरी हतबल,बँकेतच पेटवून घेण्याचा प्रयत्न

Farmer Attempting Suicide For Crop Loan
Farmer Attempting Suicide For Crop Loanesakal
Updated on

वाटुर (जि.जालना) : पिककर्ज मिळत नसल्याने हतबल होऊन शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत बँकेतच अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना परतुर (Partur) तालुक्यातील वाटूर फाटा गावात घडली. मुक्तीराम नानाभाऊ घाडगे असे त्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांची वाई शिवारात शेतजमीन आहे. मुक्तीराम हे मागच्या चार महिन्यांपासून वाटूर इथल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत (Farmer) पीक कर्जासाठी चकरा मारत आहेत. मात्र बँक व्यवस्थापक त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देत कर्ज देण्यास टाळाटाळ करतायत. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने आज सोमवारी (ता.११) बँकेतच अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तिथे असलेल्या पोलीस (Crops Loan) कर्मचाऱ्यांमुळे अनर्थ टळला असून पोलिसांनी या शेतकऱ्याला (Jalna) ताब्यात घेतलयं. गेल्या चार महिन्यांपासुन पिक घेण्यासाठी मी चकरा मारत आहे.

Farmer Attempting Suicide For Crop Loan
कर्ज अन् अतिवृष्टीमुळे आशा संपली, शेतमजुराने घेतले विषारी औषध

तरी बँक मॅनेजर याच्या मनमानी कारभारामुळे व बँकेत दलाला वाढले. दलालामार्फत लवकर कर्ज मिळते. शेतकऱ्याने ते लवकर दिले जात नाही. सध्या मी खुप वैतागलो. त्यामुळे आत्मदहनाचा विचार केला. मला लवकर कर्ज उपलब्ध करून द्यावी. नसता कुटुंबासह आत्महत्या करेल, असे शेतकरी मुक्तीराम घाटगे, वाई (ता. मंठा) यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.