जालना : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

निसर्गाचा लहरीपणा, दुष्काळ, अतिवृष्टीमुळे पिकांचे होणारे नुकसान
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्याsakal
Updated on

जालना : निसर्गाचा लहरीपणा, दुष्काळ, अतिवृष्टीमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि सततच्या नापिकीमुळे बिघडत चाललेले आर्थिक गणिते यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, आर्थिक संकटामुळे डोईजड होत असलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. अशीच एक दुर्दैवी घटना भोकरदन तालुक्यातील गारखेडा देवी येथे आज शनिवारी (ता.23) सकाळी घडली. अंकुश उत्तम देवरे (वय 35) असे आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील गारखेडा देवी येथील शेतकरी अंकुश देवरे यांनी शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेतातील जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
सांगली : शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान समिर वानखडे यांच्या पाठीशी

पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिके खराब झाली. तर उरल्या सुरल्या सोयाबीनला भाव न मिळाल्याने घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अंकुश देवरे यांनी सकाळी जनावरांना चारापाणी करण्यासाठी शेतात गेले असता जनावरांच्या गोठ्यातील अँगलला दोरी लावून गळफास घेतल्याचे नातेवाईकांनी सांगितले. सदरील घटना लक्षात आल्यानंतर त्यांना तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तपासून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, आत्महत्याग्रस्त शेतकरी अंकुश देवरे यांनी आत्महत्या पूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे समजते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन मुली, एक मुलगा तसेच चार भाऊ असा मोठा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()