Beed News : 'त्याचा' बाजार उठला! फेसबुकवर बघून बैलजोडी मागवली अन् 95 हजारांना बुडाला

farmer from beed order pair of oxen from ad on facebook cheated for 95 thousand
farmer from beed order pair of oxen from ad on facebook cheated for 95 thousand
Updated on

सध्या ऑनलाइन खरेदीचं युग आहे. सण समारंभांसाठी लोक मोठ्या संख्येने ऑनलाइन खरेदी करतात. दरम्यान बीड जील्ह्यात एका शेतकऱ्यांला ऑनलाइन बैलजोडी खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे. शेतकऱ्याची फसवणुक करत सायबर गुन्हेगांरानी ९५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, अज्ञात व्यक्तीने फसवणूक केलेल्या शेतकऱ्याचे नाव ज्ञानेश्वर दगडू फरताडे (रा. कारी, ता. धारूर) असून त्यांना वेगवेगळ्या कामासाठी 95 हजार रुपये आपल्या खात्यावर टाकायला सांगतले आणि बैलजोडी दिली नाही.

ज्ञानेश्वर फरताडे यांनी १९ जानेवारी रोजी फेसबुकवर बैलजोडीची जाहिरात पहिली. त्यानंतर त्यांनी ही बैलजोडी खरेदी करण्यासाठी जाहिरातवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.

यावेळी समोरील अज्ञात व्यक्तीने बैलजोडी शासकीय वाहनाने पाठवितो असे सांगितले. मात्र बैलजोडी पाठवण्यासाठी वेगवेगळे शुल्क भरावे लागणार असल्याचे सांगून, फरताडे यांच्याकडून९५ हजार १४४ रुपये ऑनलाइन पद्धतीने उकळले.

farmer from beed order pair of oxen from ad on facebook cheated for 95 thousand
Ajit Pawar : 'त्यांना डायपर घातले पाहिजे...'; हिंदू जन आक्रोश मोर्चातून थेट पवारांवर अर्वाच्च भाषेत हल्ला

दरम्यान फेसबुकवरील जाहीरात पाहूण बैलजौडीसाठी ऑनलाइन पैसे दिल्यानंतरही बैलजोडी मिळाली नाही. यानंतर त्यांनी जाहीरातीवर दिलेल्या क्रमांकावर पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना उत्तर मिळाले नाही. यानंतर फसवणुक झाल्याचे फरताडे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत दोन अनोळखी व्यपारी व एक अनोळखी वाहन चालक अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.

farmer from beed order pair of oxen from ad on facebook cheated for 95 thousand
युपीतला सेक्युरिटी गार्ड अन् पाकिस्तानी तरुणीचं ऑनलाईन प्रेम; नेपाळमध्ये लग्नही केलं, पण नशीब…

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.