Onian Rate: शेतकऱ्यांच्या मदतीला KCR धावले! महाराष्ट्राच्या कांद्याला तेलंगणाने दिली दराची हमी

Onian Rate
Onian Rate
Updated on

कन्नड : कांद्याला तेलंगणाने दिली भावाची हमी महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या डोळ्यातले पाणी झाले कमी झाले, असे म्हणण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणा राज्यातील हैद्राबाद बाजार समितीत १७०० ते २००० हजार भाव मिळणार असल्याने दोन दिवसात कन्नड तालुक्यातुन ६ ट्रक रवाना झाले आहेत.

Onian Rate
Mumbai News : आता रुग्णालयातच कचऱ्याची विल्हेवाट; ४ रुग्णालयात १५ भूमिगत कचरा पेट्या

तब्बल १ हजार ५०० क्विंटल कांदा खास हैद्राबादी गुलाबी रंगाच्या रिबीनी, पतक्याने सजवलेल्या ट्रक मधून रवाना झाला आहे. गाडीचे पुजन करुन हैद्राबादला शेतकऱ्यांनी कांदा पाठवला आहे.

तेलंगणाने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रात पक्षाचा पाय रोवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी अबकी बार किसान सरकार, अशी घोषणाही दिली आहे. त्यातच आता शेतकऱ्यांचा कांदा चढ्या भावाने घेण्यासाठी तेलंगणाने पुढाकार घेतला आहे. (Latest Marathi News)

शेतकऱ्यांनी रात्री-अपरात्री पाणी भरुन ४० ते ६० हजार रुपये खर्च करुन पिकवलेल्या कांद्याला महाराष्ट्रात ३०० ते ६०० रुपये भाव मिळत आहे. यातून कांदा काढणीचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होते.

बीआरएस मध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जिल्ह्यातील कांद्याच्या प्रश्ना बाबत धुळे -सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करत आवाज उठवला होता. आंदोलना दरम्यान तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी हर्षवर्धन जाधव यांनी थेट दूरध्वनीवरून चर्चा केली. (Marathi Tajya Batmya)

Onian Rate
Gajanan Kirtikar: "शिवसेनेच्या 40 आमदारांमुळंच भाजप पुन्हा सत्तेत"; खासदार किर्तीकरांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा खरेदी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री केसीआर यांनी यावेळी दिले. त्या आश्वासनाची पुर्तता करायची म्हणून हैद्राबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक एम. रविकांत यांच्यासह मोठमोठे कांदा व्यापारी महाराष्ट्रात पाठवले. त्यांनी कांद्याला १७०० ते २००० रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी हैद्राबादला कांदा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बीआरएसचे हर्षवर्धन जाधव यांच्या माध्यमातून दोन दिवसात ६ ट्रकमधुन १ हजार ५०० क्विंटल कांदा हैद्राबाद बाजार समितीत पाठवला आहे.

दोन दिवसात पाठवलेल्या कांद्याची पट्टी होऊन खरच किती भाव महाराष्ट्रातील कांद्याला मिळतो आहे हे कळणार आहे. जर खरच व्यापाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे भाव मिळाला तर तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात कांदा हैद्राबाद पाठण्यासाठी शेतकरी सरसावतील एवढे मात्र खर.

शेतकरी व्यक्त करत आहेत करताय समाधान

कांदा वाहतूकीसाठी लागणारा ट्रक व हमाल खर्च थेट हैद्राबादहुन आले आहेत. कांदा भरण्यासाठी शेतकऱ्यांना गोणी ( बारदान) मोफत देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ट्रक भाडे, डिझेल खर्च व हमाल खर्च सुरुवातीला करण्याची गरज नाही.

जेंव्हा लिलाव होईल त्यानंतर ट्रक भाडे व ईतर खर्च वजा करून शेतकऱ्यांना उर्वरित सर्व पैसे त्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात येणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्रात मातीमोल भावाने कांदा खरेदी सुरू आहे. तेलंगणात ह्याच आपल्या कांद्याला जर १७०० रुपये भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. खर्च वजा प्रती क्विंटल १ हजार रुपये जरी हातात पडले तरी आम्ही समाधानी आहोत.

आपले व्यापारी १४० -३०० रुपये क्विंटल भावने घेत असलेला कांदा फक्त बीआरएसच्या आंदोलनामुळे व तेलंगणा सरकारमुळे किमान ते ७०० ते ९०० भावाने घेत आहे. हे थोडेफार भाव वाढले यांचे श्रेय हर्षवर्धन जाधव यांच्या आंदोलनालाच जाते.

- देविदास वारे. (औराळी)

महाराष्ट्रातील कांदा ९ वर्षापूर्वी स्थापन झालेले तेलंगणा राज्य चांगल्या दराने खरेदी करते आहे. हे आपल्या राज्यसरकारचे अपयश आहे. त्या राज्याला १७०० ते २००० हजार रुपयांने देखील कांदा खरेदी करण्यासाठी परवडते आणि आपल्या राज्यातील कांदा आपल्या सरकारला खरेदी करणे परवडत नाही0 यांचे नेमके काय कारण हे शोधण्याची आता वेळ आली आहे.

- हर्षवर्धन जाधव. (माजी आमदार कन्नड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.